- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, १२ जून २०१९
मोदी सरकारने अल्पसंख्यांकाकरता मदरशांचे आधुनिकीकरण तसेच शिष्यवृती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे निर्णय म्हणजे मोदी सरकारचे अल्पसंख्यांकाबद्दलची कणव नसून पुतणा मावशीचे प्रेम आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्र सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत करत असतात परंतु मोदी सरकारने मदरशांचे आधुनिकीकरण व शिष्यवृत्तीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे स्वागत अजूनपर्यंत का केले नाही. या प्रश्नाच्या उत्तरातच भाजपाचा दुटप्पीपणा दडलेला आहे, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.
=======================================================
इतर बातम्यांचाही मागोवा