काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा खटाटोप

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 7 जून 2019 :

काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड खटाटोप करीत आहेत. अनेक आमदारांना ते फोन करीत आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

शुक्रवारी दुपारी टिळक भवन येथे आयोजित बैठकीनंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले म्हणून भारतीय जनता पक्षाने हुरळून जाण्याची गरज नाही. या सरकारवर लोक नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगवेगळे असू शकतात, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही तेच दिसून येईल, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

=============================================

इतर बातम्यांचाही मागोवा