स्थायी समिती सभापतीपदी नविन गवते

????????????????????????????????????

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, 27 मे 2019 :

नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिघा इथले नगरसेवक नविन मोरेश्वर गवते यांची बहुमताने निवड करण्यात आली. स्थायी समिती सभापतीपदासाठी नवीन गवते आणि शिवसेनेचे नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांनी अर्ज दाखल केले होते. नविन गवते यांना 9 तसेच ज्ञानेश्वर नारायण सुतार यांना 7 मते मिळाली.

स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे 8, शिवसेना-भाजपा युतीचे 7 तर कॉंग्रेसचा 1 सदस्य आहे. रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी या निवडप्रक्रियेत पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. नवनिर्वाचित सभापतींचे महापौर जयवंत सुतार आणि इतर मान्यवरांनी अभिनंदन केले.