कोकणात निलेश राणेंच्या स्वप्नाला सुरूंग, शिवसेनेचे विनायक राऊत विजयी

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग, २३ मे २०१९

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणे यांच्याविरोधात एक लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 4 लाख 5८ हजार 22 मते पडली तर निलेश राणे यांना 2 लाख 79 हजार 700 मते मिळाली आहेत. राऊत यांना 1 लाख 78 हजार 322 मते अधिक मिळाली. काँग्रेसच्या नवीनचंद्र बांदीवडेकर यांनी 63 हजार 299मते मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. निलेश राणे यांच्या पराभवामुळे नारायण राणेंच्या कोकण पट्ट्यातील वर्चस्वाला धक्का बसला आहे.

क्रमांक उमेदवार पक्ष मते टक्केवारी
1 किशोर सिदू वरक बहुजन समाज पार्टी 6868 0.76
2 नविनचंद्र भालचंद्र बांदिवडेकर कांग्रेस 63299 7.02
3 विनायक राऊत शिवसेना 458022 50.83
4 निलेश नारायण राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, 279700 31.04
5 भिकुराम काशिराम पालकर बहुजन मुक्ति पार्टी 5904 0.66
6 मारुती रामचंद्र जोशी वंचित बहुजन अघाडी 30882 3.43
7 राजेश दिलीपकुमार जाधव बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी 9565 1.06
8 ॲङ संजय शरद गांगनाईक समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक 2134 0.24
9 आंबेरकर पंढरीनाथ विद्याधर अपक्ष 3257 0.36
10 नारायण दशरथ गवस अपक्ष 5633 0.63
11 निलेश भिकाजी भातडे अपक्ष 17668 1.96
12 विनायक लवू राऊत अपक्ष 4393 0.49
13 NOTA वरीलपैकी कोणीही नाही 13777 1.53
एकूण 901102

 

========================================================

इतर बातम्यांचाही मागोवा