अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबईः
युनेस्को, नवी दिल्ली व टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स (TISS) यांच्या एकत्रित गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा समावेश करून संशोधन अहवाल तयार करण्यात येत आहे. यासाठी नमुंमपा इटीसी केंद्रामार्फत करण्यात येणा-या उपक्रमांची दखल घेत या उपक्रमांचे दृक् श्राव्य चित्रीकरण नुकतेच इटीसी केंद्रामध्ये करण्यात आले.
युनेस्को, नवी दिल्ली व टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स (TISS) यांच्या एकत्रित गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा समावेश करून दिव्यांग मुलांच्या हक्कात वाढ ( Promoting the Rights of Children with Disability (CWDs) to inclusive Quality Education) या कार्यक्रमांतर्गत N for Nose – State of the Education Report for India 2019 : Children with Disabilities असा संशोधन अहवाल तयार करण्यात येत आहे.
या संदर्भात आकलनात्मक श्राव्य व दृश्य संच (Comprehensive Audio Visual Package) ‘स्नो लिपोपार्ड’ या संस्थेसोबत युनेस्को तयार करीत आहे. TISS व Snow Leopard यांनी याकरिता संपूर्ण देशभरातून मुंबई, उत्तराखंड, कर्नाटक व आसाम ही चार स्थाने चित्रीकरणासाठी निश्चित केली आहेत. यातील मुंबईमधील चित्रीकरण इटीसी केंद्रामध्ये करण्यात आले. यावेळी दिव्यांग मुलांना मिळणा-या सोयी-सवलती, त्यांना उपलब्ध उपचारात्मक पध्दती तसेच शिक्षण, प्रशिक्षण याबाबत माहितीदर्शक चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरणादरम्यान इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांनी माहिती दिली.
ओदिशा शासनामार्फत इटीसी पुनरावृत्ती प्रकल्प केंद्र नियोजनासाठी विशेष समितीची भेट
नवी मुंबई महानगरपालिकेच्या इटीसी अपंग अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राव्दारे दिव्यांगत्वाबाबत केलेल्या कार्यापासून प्रेरणा घेत ओदिशा राज्य सरकारने इटीसी पुनरावृत्ती असा प्रकल्प हाती घेतला आहे. त्या संदर्भात ओडिसा शासनाचा सामाजिक सुरक्षितता व दिव्यांगांचे सशक्तीकरण विभाग (Department of Social Security & Empowerment of Persons with Disabilities) यांच्यामार्फत इटीसी केंद्राप्रमाणे ओदिशामध्ये दिव्यांगांसाठी एक केंद्र बनविण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. याकरिता इटीसी केंद्राचे कामकाज, कार्यपध्दती जाणून घेण्यासाठी ओडिसा सरकारकडून सामाजिक सुरक्षितता व दिव्यांगांचे सशक्तीकरण विभागाच्या विशेष समितीने नमुंमपा इटीसी केंद्रास भेट दिली. ओदिशा शासनाच्या या विभागाच्या संचालक सुस्ताना महोपात्रा, क्षेत्रीय अधिकारी डॉ. एस. के. दाश, समन्वयक के. सी साहू यांचा या समितीमध्ये समावेश होता.