अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 6 मे 2019:
स्कॉर्पिन वर्गातल्या ‘वेला’ या चौथ्या पाणबुडीचे आज मुंबईतल्या माझगाव गदोत जलावतरण झाले. संरक्षण (उत्पादन) सचिव डॉ. अजय कुमार यांच्या पत्नी वीणा अजय कुमार यांच्या हस्ते हे जलावतरण करण्यात आले.
तत्कालीन सोव्हिएत रशियाकडून घेतलेल्या पाणबुड्यांच्या ताफ्यातल्या वला नावाच्या पाणबुडीचे नाव या नव्या पाणबुडीला देण्यात आले आहे. प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्ह अंतर्गत स्कॉर्पिन श्रेणीतल्या सहा पाणबुड्या बांधण्यासाठी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी फ्रान्समधल्या नेव्हल ग्रुपशी करार झाला आहे. माझगांव डॉक शिपबिल्डर्सने भारतीय नौदलासाठी ही पाणबुडी बांधली आहे.
भारतीय नौदलात ही पाणबुडी समाविष्ट करण्यापूर्वी बंदरात आणि समुद्रातही या पाणबुडीच्या कठोर चाचण्या घेण्यात येतील.