अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, १२ एप्रिल २०१९
राज्यातील ओबीसी ब्रिगेड या संघटनेने लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.
- ओबीसी ब्रिगेडच्या कोअर कमिटी, राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा व तालुका अध्यक्षांच्या पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महाआघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संविधान बचावासाठी तसेच लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुरोगामी विचारांच्या महाआघाडीला साथ देण्याच्या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या पाठिंब्याचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना देण्यात आल्याचे पक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
महाआघाडीला याआधीच ५६ पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला असून दिवसेंदिवस पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढतच आहे, त्यामुळे महाआघाडीला अधिक बळ प्राप्त झाले आहे.