अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क
नवी मुंबई, 2 एप्रिल 2019:
नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे आज कोपरखैरणे विभागात अचानक धडक कारवाई करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापारी आणि दुकानदारावर धडक कारवाई केली. या कारवाईत १६ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी धडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. याअनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे आणि त्यांच्या पथकाने २ एप्रिल रोजी कोपरखैरणे विभागात अचानक प्लास्टिक बंदीविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान ३ प्लास्टिक वापर करणारे आणि ४ उपद्रव करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून दंडात्मक १६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला गेला.
- उपायुक्त तुषार पवार यांनी प्लास्टिकबंदीविरोधात इतरही विभागांमध्ये धडक कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना आहेत. तसेच महापालिका हद्दीतील सर्व व्यापारीवर्ग तसेच नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहनही आयुक्त आणि उपायुक्तांनी केल्याची माहिती मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे यांनी दिली.
======================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
=======================================================