युतीच्या श्रीरंग बारणेंच्य़ा प्रचार दौरे, बैठकांना कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद

अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क

पनवेल, १ एप्रिल २०१९:

मावळ मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांनी रविवारी पनवेल मतदारसंघात विभागवार प्रचार दौरा करून बैठका घेतल्या. त्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे पाहावयास मिळाले.

महायुतीच्या खारघर येथील बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार मनोहर भोईर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, संपर्कप्रमुख दत्ता दळवी, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार बबन पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, संघटक दीपक निकम, तालुका संघटक भरत पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगरप्रमुख दीपक घरत, भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा कल्पना राऊत, शिवसेना महिला आघाडी जिल्हा उपसंघटक कल्पना पाटील, माजी महापौर चारुशीला घरत आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.
  • खासदार श्रीरंग बारणे हे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने जनतेच्या संपर्कात होते व त्यांनी मोठ्या प्रमाणात केंद्रातील योजना पनवेल व उरण परिसरात राबविल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संसदेत पाठविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन प्रचार करावा, असे आवाहन पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर यांनी केले. 

 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात विकासाच्या योजना देशात राबविल्या. या योजना पनवेल व उरण परिसरात राबविण्याचे कामसुद्धा महायुतीच्या माध्यमातून मी केले आहे. समोरचा उमेदवार हा नवखा असून, फक्त पवार घराणे हे लेबल त्याच्याकडे आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

 

  • आमदार मनोहर भोईर म्हणाले की, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पनवेल उरण, कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघांतून मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे. ते येथून एक लाखापेक्षा जास्त मतांचा लीड घेऊन जातील..

 

  • एक चांगला खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांना पुन्हा आपल्याला निवडून द्यायचे आहे. स्थानिक प्रश्नांबाबत त्यांनी केंद्र सरकारकडे वाचा फोडली असून, पाच वेळा संसदरत्न हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांच्या विजयासाठी वातावरण अनुकूल असले, तरी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाफिल राहू नये, असे शिवसेना संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांनी सांगितले.

 

  • पनवेल महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्या माध्यमातून अनेक विकासकामे शहर व ग्रामीण परिसरात करण्यात येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना आणल्या, त्यासुद्धा राबविण्याचे काम सुरू असून, त्याचाही फायदा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना होईल, असे  महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सांगितले.

=======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा