व्यापाऱ्यांकडून चीनी वस्तूंची होळी

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, १९ मार्च २०१९:

कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी आज चिनी मालावर बहिष्कार टाकत होळी करण्यात आली. यावेळी फुलवामा आणि अन्य दहशतवादी हल्ल्यांमधील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

  • खाद्य तेल व्यापारी असोसिएशन, महाराष्ट्र फेडरेशन ऑफ स्टेशनरी मॅन्युफॅक्चर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन, रिटेल ग्रेन डीलर्स असोसिएशन, मांडवी मेवा मसाला असोसिएशन, ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेअर संघ, बाँबे लाइट अँड स्टोव्ह असोसिएशन आणि अन्य व्यापारी संघटनांसह व्यापाऱ्यांनी या प्रदर्शनात भाग घेतला होता.

 

  • नवी मुंबई चेंबर्सतर्फे नवी मुंबईतील मसाला मार्केटजवळ व्यापाऱ्यांनी चिनी सामानाची होळी केली.देशभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे चिनी साहित्यावर बहिष्कार टाकण्याबाबत शपथ घेण्यात आल्याची माहिती धान्य व मसाला मार्केट व्यापारी संघटनेचे पदाधिकारी किर्ती राणा यांनी पत्रकाद्वारे दिली.

====================================================

इतर बातम्यांचाही मागोवा