१० वी, १२वी परिक्षार्थींना NMMT प्रवासात सूट द्या

  • नवी मुंबई भाजप युवा नेते रणजित नाईक यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, २२ फेब्रुवारी २०१८

नवी मुंबई परिसरात बारावी आणि दहावीच्या परिक्षार्थी  विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान NMMT प्रवासात सूट द्यावी, अशी मागणी नवी मुंबई भाजप युवा नेते रणजित नाईक यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन नाईक यांनी आपल्या शिष्टमंडळासह आयुक्तांना दिले.

22 फेब्रुवारी ते 20 मार्च  2019 या कालावधीत (H.S.C) उच्च माध्यमिक व दिनांक 1मार्च ते 22 मार्च 2019  ( S.S.C) माध्यमिक विभागाच्या परीक्षा जाहीर झालेल्या आहेत. या कालावधीत बेस्ट परिवहन उपक्रमाने तसेच ठाणे परिवहनतर्फेही या परीक्षार्थी विद्यार्थ्यांकरिता प्रवासात सवलत जाहीर केलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेनेदेखील १० वी, १२वीच्या परिक्षार्थींसाठी आपल्या परिवहन सेवेत परिक्षेच्या काळात सवलत जाहीर करावी अशी मागणी आज भाजपा युवा मोर्चा नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली. यावेळी युवा नेते रणजित नाईक यांच्यासोबत दत्ता घंगाळे, कुणाल महाडिक आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

=============================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

 

  • https://goo.gl/hda3p9
    शिवजयंतीनिमित्त रुग्णांना फळवाटप