नवी मुंबई महापालिकेचा सन २०१९-२० चा अर्थसंकल्प

 

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2018-19 चा सुधारित आणि सन 2019-20 चे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी स्थायी समितीपुढे सभापती सुरेश कुलकर्णी यांच्याकडे सादर केला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 95 नुसार सदर जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु. 1507.57 कोटी व रु. 2113.51 कोटी जमेचे आणि रु. 2710.93 कोटी खर्चाचे  सन 2018-19 चे सुधारित अंदाज, तसेच रु. 910.15 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु. 3455.64 कोटी जमा व रु. 3454.73 कोटी खर्चाचे आणि रु. 91.00 लक्ष शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2019-20 चे मूळ अंदाज स्थायी समितीच्या समोर सादर करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिकेचे अंदाज सादर करताना महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या आर्थिक स्त्रोतांपासून अधिकाधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.  तसेच महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवश्यक नागरी सेवा-सुविधा पुरविताना त्यामध्ये गुणात्मक वाढ करुन नागरिकांच्या समाधानासोबतच शहराचा नावलौकीक वाढविण्याकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न आहे.महानगरपालिकेचे कामकाज ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करुन गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख करणे, महानगरपालिकेशी संबंधित नागरिकांची कामे अल्प वेळेत व समाधानकारक रितीने पूर्ण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे,  कर वसुलीच्या पध्दतींमध्ये अधिक सुसूत्रता आणून महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे त्याचप्रमाणे खर्चाच्या बाबींचा प्राधान्यक्रम ठरवून जास्तीत जास्त लोकोपयोगी कामे करण्यावर भर देण्याचे ठरविले आहे.त्या अनुषंगाने सन 2019-20 या वर्षाचे अंदाज सादर करताना शहर विकासाबाबत लोकप्रतिनिधी तसेच शहराविषयी प्रेम असणारे नागरिक यांच्या संकल्पना, सूचना अशा विविध बाबींचा साकल्याने विचार करुन जमा-खर्चाचे अंदाज तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली.

 

उत्पन्नाच्या बाबी

महानगरपालिकेच्या महसूली उत्पन्नामध्ये स्थानिक संस्था करापोटी शासनाकडून मिळणारे सहाय्यक अनुदान व नोंदणी शुल्क, मालमत्ता कर, नगररचना विभागामार्फत प्राप्त होणारे शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता उपयोगिता, विविध सेवा व इतर साधनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नांचा समावेश आहे.

  •  मालमत्ता कर

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांवर (जमिनी व इमारती) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 127 व 129 अन्वये मालमत्ता कर आकारण्यात येतो. अधिनियमातील कलम 128 तसेच कराधान प्रकरण 8 नुसार मालमत्ता कर वसूली करण्यात येते. आजतागायत एकूण 3,13,480 इतक्या मालमत्ता निर्धारीत करण्यात आल्या असून त्यामध्ये निवासी 2,59,565; अनिवासी 48,960 व औद्योगिक 4,955 इतक्या मालमत्ता आहेत.

  कर आकारणी विभागामार्फत वाढीव बांधकाम, वापरात बदल तसेच अनधिकृत बांधकाम यांचे नियमितपणे सर्वेक्षण करून अधिनियमातील तरतूदीनुसार कर निर्धारण करण्यात येते, तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कराधान प्रकरण 8, नियम 8 मधील जे मालमत्ताधारक स्वत:हून मालमत्तेमधील बदलाबाबत महानगरपालिकेच्या निदर्शनास आणतात त्यांचे नियमानुसार कर निर्धारण करण्यात येते.

  प्रलंबित मालमत्ता कराची वसूली प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आलेली आहेत. यामध्ये मुख्यालय स्तरावर सहा. कर निर्धारक व संकलक/प्रशासकीय अधिकारी तसेच विभाग कार्यालय स्तरावर अधिक्षक/वसूली अधिकारी व कर निरीक्षक अशी पथके तयार करण्यात आलेली आहेत.

  थकबाकीदारांना भेटी देऊन त्यांची मालमत्ता जप्त करणे, बँक खाती गोठवणे इत्यादी कारवाई करण्यात येते, परंतू औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ता धारकांच्या थकीत मालमत्ता करावरील शास्ती/दंडाच्या रकमेवर मा. सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्तीची कारवाई (No Coercive Steps) न करणेबाबत आदेशित केले आहे. सदर थकीत मालमत्ता करधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

  प्रलंबित मालमत्ता कराचा भरणा करावा तसेच कटू कारवाई टाळावी याकरिता नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

  नगररचना विभागाकडून विकास परवानगी घेऊन बांधकाम करून ज्या मालमत्ता धारकांनी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त केलेले नाही, परंतू वापर सुरू केला आहे अशा मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्यांना नियमानुसार शास्तीसह कर आकारणी करण्यात येते.

  निवासी/वाणिज्य इमारतीमधील मालमत्ता धारकांना स्वतंत्र देयके देण्यात येत आहेत. पुर्वी संपूर्ण इमारतीचे एकच मालमत्ता कर देयक देण्यात येत होते. सदर इमारतीतील काही सदनिका/दुकाने बंद असल्यास संपूर्ण इमारतीचा कर थकीत राहत होता परंतु आता युनिटनिहाय स्वतंत्र देयक देण्यात येत असल्याने तेथील रहिवाशी आपला कर त्वरीत भरणा करीत आहेत, त्यामुळे करभरणा करणे वाढले आहे तसेच थकबाकीदारांविरूध्द कारवाई करणे शक्य झाले आहे.

 शहरातील सुशिक्षिततेचे मोठे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांना करभरणा करणे सहज, सुलभ व्हावे या दृष्टीने महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पदधतीने कर भरणा करणेसाठी तसेच मोबाईल ॲपव्दारे मालमत्ता कर भरणा करण्याकरिता नागरिकांसाठी/करदात्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

 माहे नोव्हेंबर 2018 अखेर रू. 346.79 कोटी मालमत्ता कराची वसूली करण्यात आलेली आहे व   मार्च-2019 अखेर रु. 550 कोटी वसूली होईल अशी अपेक्षा आहे. तसेच सन 2019-20 या वर्षामध्ये रु. 570 कोटी जमा होईल असा अंदाज आहे.

  •  स्थानिक संस्था कर :-

 केंद्र शासनाने अधिसूचित केल्यानुसार संपूर्ण देशात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी दिनांक 01 जुलै, 2017 पासून सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (स्थानिक प्राधिकरणांना भरपाई देण्याबाबत) अधिनियम-2017 अंतर्गत राज्यातील महानगरपालिकांना जुलै 2017 पासून अनुदान वितरीत करण्यात येत आहे.

 शासनाकडून सहाय्यक अनुदान – सन 2018-19 या वर्षात शासनाकडून सहाय्यक अनुदानापोटी एप्रिल 2018 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत रु. 683.44 कोटी एवढी रक्कम प्रत्यक्ष जमा झाली असून डिसेंबर 2018 ते मार्च 2019 पर्यंत रु. 341.72 कोटी एवढी रक्कम अपेक्षित आहे. सन 2019-20 साठी शासनाकडून सहाय्यक अनुदानापोटी रक्कम रु. 1034.61 कोटी अंदाजित आहे.

 मुद्रांक शुल्क अनुदान – सन 2018-19 या वर्षात मुद्रांक शुल्क अनुदानापोटी रु. 59.12 कोटी एवढी रक्कम अपेक्षित आहे. व सन 2019-20 वर्षात मुद्रांक शुल्क शुल्क अनुदानापोटी रु. 62.70 कोटी अंदाजित आहे.

 प्रलंबित कर निर्धारणा व प्रलंबित वसूलीव्दारे उत्पन्न, शासनाचे सहाय्यक अनुदान व मुद्रांक शुल्क अनुदान मिळून एकत्रित सन 2019-20 करिता रू. 1157.71 कोटी उद्दिष्ट प्रस्तावित करण्यात येत आहे.

 

  •  नगररचना विभाग :-

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रात समाविष्ट 30 महसूली गावांपैकी सिडकोच्या अंतिम विकास योजनेत समाविष्ट 29 गावांच्या हद्दीतील क्षेत्राची सुधारीत विकास योजना व उक्त क्षेत्राबाहेरील अडवली-भूतवली या महसूली गावांची नवीन विकास योजना तयार करण्यात येत आहे.

 त्याबाबतचा इरादा शासन राजपत्रात दिनांक 15/12/2017 रोजी प्रसिध्द करणेत आला आहे. तद्नंतर प्रत्यक्ष जमीन वापर सर्व्हेक्षण व जमीन वापर नकाशा तयार करणेत आला आहे. शहराची पुढील 20 वर्षाची 28 लक्ष एवढी संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन आवश्यक जमीन वापर प्रस्तावित करण्यात आला असून पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक आरक्षणाकरीता महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 31 (5) नुसार पुढील 10 वर्षाची 23.30 लक्ष एवढी संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन विकास योजना तयार करुन मंजूरीसाठी सर्वसाधारण सभेत सादर केली आहे. त्यामध्ये सूक्ष्म स्तरावर सार्वजनिक सोयी व सुविधांची आरक्षणे दर्शविण्यात आलेली आहेत. सार्वजनिक सोयी व सुविधांच्या आरक्षणासाठी एकूण 562 ठिकाणी साधारणत: 856.13 हेक्टर जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. सार्वजनिक आरक्षणांमध्ये प्रामुख्याने शाळा, महाविद्यालये, खेळाची मैदाने, सार्वजनिक मैदाने, उद्याने, बाजार, पार्किंग, रात्र निवारा केंद्र, जेष्ठ नागरिंक निवारा केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र, दिव्यांगांसाठी सुविधा केंद्र, क्रीडा संकुले, अग्निशमन केंद्र, समाज मंदिरे इत्यादी मुलभूत सुविधांकरीता आरक्षणे प्रस्तावित आहेत. तसेच  City Mobility Plan विचारात घेऊन नवीन रस्ते आणि रस्ता रुंदीकरणाचे प्रस्ताव अंतर्भूत आहेत. त्यासोबत प्रारुप विकास योजना अहवाल आणि प्रारुप विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली तयार करणेत आलेली असून माहे फेब्रुवारी 2019 मध्ये होणा-या मा. सर्वसाधारण सभेत सादर करणेत येत आहे. त्यास मा. सर्वसाधारण सभेची मंजूरी मिळाल्यानंतर प्रारुप विकास योजना हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिध्द करण्यात येईल.

 त्याचप्रमाणे प्रारुप विकास योजना (मूळ व सुधारीत) तयार करणेसाठी उपग्रह प्रतिमेचा (Sattelite Imagery) वापर करण्यात आला असून सदर विकास योजना भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) शी समाकालित (integrate) करण्यात येत आहे.

 नगररचना विभागाकडून माहे नोहेंबर 2018 अखेर रु. 109.62 कोटी ची वसूली करण्यात आलेली असून मार्च 2019 अखेर रु. 135.00 कोटी इतकी वसूली होईल अशी अपेक्षा आहे. तसेच सन 2019-20 या वर्षामध्ये रु. 170.00 कोटी जमा होईल असा अंदाज आहे.

 

 

  •  मालमत्ता विभाग :-

  जन सायकल सहभाग प्रणाली (Public Bicycle Sharing System) :-

शहराचा सर्वांगीण विकास होताना पर्यावरणपूरक शहर म्हणून नवी मुंबई विकसित व्हावे यादृष्टीने मालमत्ता विभागामार्फत “जन सायकल सहभाग प्रणाली (Public Bicycle Sharing System)” राबविण्यात येत आहे. सदर प्रणालीस नवी मुंबई क्षेत्रातील नागरिकांकडून अत्यंत उत्साही प्रतिसाद प्राप्त होत असून 29000 नागरिकांनी जन सायकल सहभाग प्रणालीमध्ये सहभाग घेत सायकल वापराकरीता ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. तसेच 3 महिन्यांत 68,000 सायकल फे-या झालेल्या असून जन सायकल प्रणालीच्या माध्यमातून सायकलचा वापर करणारे नवी मुंबई हे भारतातील सर्वाधिक प्रतिसाद देणारे शहर ठरत आहे.

  नौका विहार :-

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पर्यटनाला चालना व स्थानिकांना रोजगार मिळावा यादृष्टीने वाशी सेक्टर 10ए येथे व कोपरखैरणे सेक्टर 19 येथील धारण तलावामध्ये नौकाविहार सुरु करण्यात आलेले आहे. आगामी काळात दिघा येथील खोकड तलाव याठिकाणी नौकाविहार सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

  पर्यटनाला चालना :-

नेरुळ सेक्टर-26 येथील धारण तलावामध्ये आकर्षक कारंजे उभारुन पर्यटनाला चालना देण्याचा मानस आहे.

  सिडको, एम.आय.डी.सी., जिल्हा परिषद, शासन यांचेकडून हस्तांतरीत मालमत्ता :-

महानगरपालिकेच्या मालकीच्या स्वत:च्या जागा नसल्यामुळे महानगरपालिकेस सिडको, एम.आय.डी.सी., शासन यांचेवर सार्वजनिक प्रयोजनाच्या भूखंडाकरीता अवलंबून रहावे लागते. त्याकरिता संबंधीत विभागाकडे पाठपुरावा करण्यात येतो. सिडकोकडून एकूण 151 भूखंड (उदयान, खेळाचे मैदान, शाळेचे खेळाचे मैदान, Setting Up Indoor Recreation इ.) उपलब्ध झालेले आहेत त्यामध्ये Slaughter House अशा प्रयोजनासाठी शिरवणे येथे सर्वे क्र.323B(PT), क्षेत्रफळ 85169.28 चौ.मी. नवी मुंबई महानगरपालिकेस वाटप करण्यात आलेला आहे. तसेच नेरुळ से.19 ए या ठिकाणी वंडर्स पार्क मधील जागेत सायन्स पार्क विकसित करण्यासाठी FSI घेण्यास सिडकोने तत्वत: मान्यता दिलेली आहे. एम.आय.डी.सी. कडून एकूण 37 भूखंड        (शौचालय-25, जलकुंभ-8, दफनभूमी-2, आरोग्यकेंद्र-1, कातकरीपाडा पुनर्वसन-1), आणि शासनाकडून मौजे-तुर्भे ता.जि.ठाणे येथील गट नं.376 मधील क्षेत्र 18.00 एकर व गट नं.377 मधील क्षेत्र 3.75 एकर आणि गट नं.378 मधील क्षेत्र 12.25 एकर अशी एकूण 34.00 एकर जमीन घनकचरा व्यवस्थापनाकरिता महानगरपालिकेस हस्तांतरीत झालेली आहे.

  दिव्यांग स्टॉल :-

मा. सर्वसाधारण सभा, ठराव क्र.1952, दि.14/09/2017 अन्वये महानगरपालिका क्षेत्रातील बेरोजगार दिव्यांगांना अत्यल्प मासिक शुल्क आकारुन 103 स्टॉल्सकरिता 30 वर्षाच्या कालावधीसाठी जागा देण्यात आलेल्या आहेत.

  बहुउद्देशीय इमारत विनियोग :-

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, जुईपाडा, कोपरखैरणे, ऐरोली या 5 ठिकाणी वातानुकुलित व बिगर वातानुकुलित सुविधा असलेल्या बहुउद्देशीय इमारतीमध्ये  महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना लग्नकार्य, मुंज, साखरपुडा, विविध कार्यशाळा, मेळावे, सभा, प्रदर्शन, बैठका व वाढदिवस अशा विविध प्रयोजनांकरीता मा. सर्वसाधारण सभा ठराव क्र.378, दि.18/05/2018 अन्वये वाजवी दराने जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, त्यास नागरिकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

  मल्टीलेव्हल पार्किंग :-

शहरातील वाढती वाहनांची संख्या विचारात घेऊन आगामी काळात बेलापूर सेक्टर-15 मध्ये  भूखंड क्र.72 व भूखंड क्र.39 येथे मल्टीलेव्हल पार्किंग करण्याचे नियोजन आहे.

सन 2019-20 या वर्षामध्ये मालमत्ता विभागाकडून रु. 1.13 कोटी जमा होईल असा अंदाज आहे.

  •   परवाना विभाग :-

  जाहिरात व आकाशचिन्ह परवाना :-

शहर सौदर्यीकरणाच्या तसेच महानगरपालिकेस भरीव उत्पन्न मिळण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक खाजगी सहभाग (PPP) तत्वावर विविध जाहिरात माध्यमे (होर्डिंग) उभारणे प्रस्तावित आहे. या अभिनव ठेक्यामुळे यापूर्वी काहीच उत्पन्न मिळत नसलेल्या महानगरपालिकेस पुढील 07 वर्षांकरीता रु. 4603.33 लक्ष इतके उत्पन्न प्राप्त होणार आहे तसेच होर्डिंगच्या जागा निश्चित होऊन शहर सौंदर्यीकरणात भर पडणार आहे.

अशाच प्रकारे नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रातील विदयुत खांबावरील जाहिरात लावणेबाबतचा ठेका देण्याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सदर ठेक्यापासून महानगरपालिकेस 03 वर्षांकरीता रु. 9.86 कोटी इतके भरीव उत्पन्न मिळणार आहे. यापूर्वी साधारणत: वार्षिक रु. 49.00 लक्ष इतके उत्पन्न्ाभ मिळत होते त्यामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.

त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील विविध उड्डाणपुलाखालील व अंडरपासखालील मोकळया जागांचे खाजगी सार्वजनिक सहभाग (PPP) या तत्वावर सुशोभिकरण करणे, देखभाल-दुरुस्ती करणे व निगा राखणे आणि त्यापोटी सदर ठिकाणी जाहिरातीचे हक्क देण्याबाबतची निविदा प्रक्रिया प्रस्तावित आहे. यापासून देखील महापालिकेस भरीव उत्पन्न मिळणार आहे.

“स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2019” च्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सामुदायिक/सार्वजनिक शौचालयांच्या भिंतीवर/उपलब्ध जागेवर जाहिरात करणेबाबतचे हक्क संस्थांना देण्यात आलेले आहेत व त्या बदल्यात त्यांनी शौचालयांची बाह्य देखभाल व सुशोभिकरण करणे आणि त्यातूनही महानगरपालिकेला उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.

अशाप्रकारे विविध जाहिरातींच्या माध्यमातून महानगरपालिकेस उत्पन्न प्राप्त होण्याबरोबरच नवी मुंबई शहराच्या सुशोभिकरणाच्या दृष्टिने सकारात्मक काम होणार आहे.

   फेरीवाला परवाना :-

पथविक्रेता (उपजिविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम 2014 नुसार नवी मुंबई महानगरपालिकेने राज्यात पहिल्यांदाच बायोमेट्रिक पध्दतीने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या आधार क्रमांकाशी निगडीत ॲपचा वापर करुन हे सर्वेक्षण पूर्ण करणारी नवी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण दोन फेऱ्यांमध्ये पूर्ण झालेले आहे. सर्वेक्षण झालेल्या पथविक्रेत्यांच्या कागदपत्रांची छाननी करुन त्यांना पात्र/अपात्र ठरवून शहर फेरीवाला समितीची मंजूरी मिळाल्यानंतर पात्र पथ विक्रेत्यांना नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याचे प्रस्तावित आहे. तथापि यापासून वंचित राहिलेल्या फेरीवाल्यांची बायोमेट्रिक पध्दतीने सर्वेक्षणाची तिसरी फेरी घेण्यात येणार आहे. यामुळे शहरातील फेरीवाल्यांवर नियंत्रण राहून रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त राहणार असून, फेरीवाला परवाना शुल्कापासून महानगरपालिकेस भरीव उत्पन्नही मिळणार आहे.

   कारखाने व उदयोगधंदे, व्यवसाय व साठा परवाना :-

नवी मुंबईतील व्यावसायिकांना सुलभ रितीने आवश्यक परवानगी, परवाने मिळावेत यादृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमास अनुसरुन Ease of Doing Bussiness  च्या अनुषंगाने, दिनांक 04/09/2017 च्या शासन निर्णयास अनुसरुन फक्त दोन कागदपत्रांच्या आधारे नवी मुंबई महानगरपालिका परवाना विभागामार्फत कारखाने/उदयोगधंदे, साठा परवाना तसेच व्यवसाय परवाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सर्वच व्यवसाय परवाने व परवानग्या ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे.

परवाना विभागामार्फत सन 2018-19 मध्ये नोव्हेंबर 2018 पर्यत रु. 2.35 कोटी इतका महसूल प्राप्त झाला आहे, व मार्च 2019 अखेर रु. 3.69 कोटी महसूल प्राप्त होणे अंदाजित आहे.

जाहिरात माध्यमातून सन 2019-20 या वर्षामध्ये रु. 7.52 कोटी एवढे उत्पन्न अपेक्षित आहे.

 

  •  पाणीपुरवठा:-

  सन 2017-18 मध्ये रु. 97.44 कोटी इतकी जमा व रु 115.85 कोटी इतका खर्च झाला आहे. पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेच्या जमा खर्चाचा विचार करता गत वर्षात रु.18.41 कोटी एवढी तूट झाली आहे.

  शासन निर्देशानुसार पाणीपुरवठा व्यवस्थेचा खर्च हा 100% पाणीपटृी इ. उत्पन्नातून करणे आवश्यक आहे. त्याकरिता नमुंमपाने दर सुरळीत करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

  पाणीपुरवठा दर सुरळीत करण्याचा प्रस्ताव तयार करताना शास्त्रोक्त्‍ अभ्यास करून सध्याच्या दरांचे 18 टप्पे कमी करून फक्त 4 टप्पे ठेवण्यात आले आहेत. हे करताना सर्वसामान्य नागरिकांवर करांचा जादा बोजा पडणार नाही याची काळजी घेण्यात आलेली असून सर्वात कमी दर हा शहरी गरीब नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने प्रति 1 हजार लिटरला 1 रूपया याप्रमाणे प्रस्तावित केला आहे. यामध्ये प्रति कुटूंब प्रति महिना 10 हजार 500 लिटर पाणी वापर अपेक्षित धरलेला आहे. त्याचप्रमाणे सर्वात जास्त्‍ दर 250 ते 300 लिटर प्रतिदिन प्रतिव्यक्ती पाणी वापरणा-या नागरिकांसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. अशाप्रकारे शहरातील नागरिकांना मुबलक व 24×7 पाणी देण्याचा मानस आहे.

  महानगरपालिका क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांमधील पाणी वापराचा आढावा घेऊन सर्वांना समान पाणी वितरण करण्याचे नियोजन आहे, जेणेकरुन पाण्याच्या अतिरिक्त वापरावर अंकुश राहून पाणी बचत होण्यास मदत होईल.

  त्याकरीता गरिबांवर आर्थिक बोजा न पडता व प्रस्तावित करण्यात आलेले पाणी दर गृहित धरून महापालिकेचे पाणीपटृीपासूनचे उत्पन्नात चांगल्या प्रकारे वाढ होईल. त्यामुळे तूट कमी होईल.

  याशिवाय थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी ग्राहकांना नोटीस देऊन अवगत करण्यात येते. थकीत पाणीपट्टी भरावी म्हणून जाहीर आवाहन करण्यात येते. थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी नळजोडण्या खंडीत करणेची कार्यवाही करण्यात येते. जास्तीत जास्त पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

  सन 2018-19 मध्ये रु. 85.51 कोटी जमा होतील अशी अपेक्षा आहे. व सन 2019-20 मध्ये अंदाजे वसूली रक्कम रु. 97.60 कोटीचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे.

 

  • प्रशासन विभाग :-

अ) महाराष्ट्र शासनाकडील वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक अनियो-2017/प्र.क्र.29/सेवा-4, दिनांक 29 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य असणारा कर्मचारी 10 वर्ष सेवा होण्यापूर्वी सेवेत असतांना मृत्यू पावल्यास, त्याचे नामनिर्देशित व्यक्तीस नामनिर्देशन केले नसल्यास त्याच्या कायदेशीर वारसास सानुग्रह अनुदान रु. 10 लक्ष  अधिक कर्मचाऱ्याच्या खाती जमा असलेली संचित रक्कम देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठी सन 2019-20 च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये रु. 1.00 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

ब) महाराष्ट्र शासनाकडील, वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक घबाअ/2012/प्र.क्र.30/2012/ विनियम, दि. 20 फेब्रुवारी 2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांना मूळ वेतनाच्या (वेतन बँडमधील वेतन + ग्रेड वेतन) 200 पट किंवा रु.50 लक्ष किंवा घराची किंमत किंवा अग्रीम परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम घरबांधणी अग्रीम मंजूर करण्यात आलेली आहे.

सन 2019-20 च्या मूळ अंदाजपत्रकात ‘घरबांधणी अग्रीम’ या लेखाशिर्षाखाली रु. 20 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे.

क)    महाराष्ट्र शासनाकडील, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक :1215/394/प्र.क्र.16/15/ नवि-28 दि.21/08/2017 रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभागवार आकृतीबंधास शासन मान्यता प्राप्त झालेली आहे. यानंतर महाराष्ट्र शासनाकडील नगररचना विभाग, शासन निर्णय क्रमांक/नमुंम-1217/प्रक्र177/17/नवि-28, दिनांक 22/09/2017 व शासन निर्णय क्रमांक/नमुंम-1217/प्रक्र179/17/नवि-28, दिनांक 22/09/2017 रोजी अनुक्रमे अग्निशमन विभाग व आरोग्य विभाग यांच्या सेवा प्रवेश नियमास शासन मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार बिंदूनामावल्या नोंदवहया सहाय्यक आयुक्त, मागासवर्ग कक्ष, कोकणभवन यांचेकडून तपासणी व प्रमाणित करुन आणण्यात आल्या असून सरळसेवेने रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य विभागातील 260 पदे व अग्निशमन विभागातील 188 पदे इतक्या पदांची भरती ऑनलाईन पदधतीने महापरीक्षा पोर्टल यांचेमार्फत पार पाडण्यात आलेली आहे. इतर विभागांचे सेवाप्रवेश नियम मंजूर होताच त्या विभागांची भरती प्रक्रिया पार पाडून महानगरपालिकेचे सर्व विभाग सक्षम केले जातील.

 खर्चाच्या बाबी 

  महानगरपालिकेस प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून खर्चाच्या बाबींची प्राथमिकता ठरविताना शहरातील लहान मुले, विद्यार्थी, तरुण वर्ग, प्रौढ, ज्येष्ठ नागरिक, महिला, सर्वसामान्य घटक व मागासवर्गीय घटक अशा सर्व वर्गांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.  नागरिकांना शहरामध्ये फिरताना कोणत्याही प्रकारचा अडथळा वा अडचण येणार नाही याची काळजी घेऊन अडथळामुक्त रस्ते व पदपथ (Barrier Free Roads and Foothpath), मुलांना-नागरिकांना खेळण्याकरीता मैदाने, विरंगुळ्यासाठी उद्याने, विशेष प्राविण्य प्राप्त करण्यासाठी खेळांची वैशिष्टयपूर्ण मैदाने, चांगल्या शैक्षणिक सुविधांसह उत्तम प्रकारच्या शाळा व मैदाने, आरोग्याच्या गरजा पुरविण्यासाठी रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे, विभाग कार्यालयांचे आधुनिकीकरण व तरुणांना नोकरीच्या अथवा उद्योगाच्या संधी अशा प्रकारच्या विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खर्चाचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेला आहे.

  •  अभियांत्रिकी विभाग

  आगामी उदिदष्टे :-

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या गांव-गावठाण क्षेत्रातील रस्त्यांची Ultra thin White Tapping काँक्रीटने सुधारणा करणे, वारणा सर्कल से.18, तुर्भे सर्व्हिस रस्ता तसेच मिसिंग लिंकची कामे करणे, नेरुळ विभागात पामबीच मार्गालगत सर्व्हिस रस्ता बांधणे तसेच नवी मुंबई महानगरपा‍‍लिका हद्दीत नागरिकांकरीता अडथळा मुक्त रस्ते व पदपथांची सुविधा उपलब्ध करुन देणेकरीता ‘अडथळामुक्त रस्ते/फुटपाथ/गटारे बांधणे’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 152.86 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 नेरुळ, तुर्भे, कोपरखैरणे तसेच इतर औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याची काँक्रिटीकरणाने सुधारणा करणे तसेच त्याकरीता कल्व्ह र्ट, ड्रेन व फुटपाथ बांधणे इत्यादी कामांकरीता अर्थसंकल्पात ‘टीटीसी औद्योगिक क्षेत्रात अडथळामुक्त रस्ते, पदपथ बांधणे’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 56.20 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 जुईनगर रेल्वे क्राँसिंग येथे उड्डाणपूल तसेच नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रात आवश्यक तेथे पादचारी पूल बांधणेकरीता ‘पादचारी पूल’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 35.20 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 सानपाडा से.19 येथील पामबीच रस्त्यावर, सेक्टर-1 येथे रेल्वे रुळाखाली, नेरुळ पामबीच  मार्गावर NRI सिग्नलजवळ तसेच दिघा नाका येथे भूयारी मार्ग बांधणेकरीता ‘भूयारी मार्ग बांधणे’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 10.49 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 शहर गतीशील योजनेअंतर्गत ठाणे-बेलापूर मार्गावर, वाशी से.17 ते सायन-पनवेल हायवेपर्यंत, तुर्भे ब्रिजवरुन फायझर रस्ता तसेच घणसोली ते ऐरोली येथे उड्डाणपूल बांधणेकरीता ‘नवीन पूल बांधणे’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 23.32 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 ऐरोली से.15 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला मार्बल लावणे, अंतर्गत सजावट करणे तसेच फर्निचरची व्यवस्था करणेकरीता ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 23.94 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 महापालिका क्षेत्रातील सर्व पे अँड पार्क भूखंड विकसित करणे तसेच आवश्यक तेथे बहुमजली पे अँड पार्क तयार करणेकरीता ‘पे अँड पार्क’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 37.12 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 नेरुळ से-19 ए मध्ये वंडर्सपार्क येथील 8.50 एकर क्षेत्रात अभिनव स्वरुपात सायन्स पार्क उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून हा पार्क ‘विज्ञान व तंत्रज्ञान हे भविष्यात मानवी आयुष्याला कसे प्रभावित करील’ या संकल्पनेवर आधारित असणार आहे. विशेषत्वाने लहान मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणारा व त्यांच्या जिज्ञासेला माहिती पुरविणारा सायन्स पार्क हा प्रकल्प नवी मुंबईचा नावलौकिक उंचावणारा ठरणार आहे. याकरिता ‘बालोद्यान/सायंटिफिक म्युझिअम/उद्यान विकसित करणे’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 15 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रातील तलावांची आवश्यक ती सुधारणा करण्याकरीता ‘तलावांची सुधारणा’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 8.36 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रातील सर्व मार्केटची सुधारणा व सुशोभिकरण करण्याचे नियोजन असून त्याकरीता मंडई/ओटले बांधणेकरीता ‘मंडई/मार्केट बांधणे’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 15.76 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रात आवश्यक त्या ठिकाणी व्यायामशाळा/समाजमंदिर/बहुउद्देशिय इमारत बांधणे व त्यांचे सुशोभिकरण करण्याचे नियोजन असून त्याकरीता ‘व्यायामशाळा/ समाजमंदिर/बहुउद्देशिय इमारत बांधणे’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 25.20 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 घणसोली व ऐरोली येथे नागरिकांकरीता नाट्यगृह बांधण्याचे नियोजन असून त्याकरीता नवी मुंबई क्षेत्रात विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ‘नाट्य संकुल/लोककला केंद्र बांधणे’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 12 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 विविध समाजाची मोठ्या प्रमाणावरील मागणी लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रात स्मशानभूमी बांधणे व त्याचे सुशोभिकरण करणेकरीता ‘स्मशानभूमी बांधणे/चिमणी बांधणे’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 8.14 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 शहरात अग्निशमन केंद्र बांधणेकरीता ‘अग्निशमन केंद्र बांधणे’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 32.96 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 महापालिका क्षेत्रात वाशी से-12 येथे ऑलिंपिक आकाराच्या (50 मी x 25 मी) तरण तलावासह अद्ययावत आंतरक्रीडा संकुल बांधण्याचे नियोजन आहे. त्यासोबतच तेथे 8 मजली इमारत बांधण्याचे नियोजन असून त्यामध्ये बस स्थानक, 12 दुकाने, 12 कार्यालये, लग्नसमारंभासाठी सभागृह तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्कींग व्यवस्था अशा अद्ययावत सुविधा असणार आहेत. साधारणत: रु. 146 कोटी इतक्या रकमेचा हा अभिनव प्रकल्प असून त्याकरीता ‘तरण तलाव’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 10 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 शहरातील सर्व मैदाने समपातळीत करुन त्यास संरक्षक भिंत बांधून विकसित करणेकरीता ‘मैदाने विकसित करणे’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 10.61 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 घणसोली येथे संगणक प्रणालीयुक्त असे मुख्य औषध भांडार गृह बांधणे तसेच महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात अदययावत यंत्रणा उभारणेसाठी स्थापत्य विषयक कामे करणेकरीता ‘दवाखाने बांधणे’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 25.16 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 घणसोली से.15 येथे अत्याधुनिक पद्धतीची शाळा बांधणे तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांची स्थापत्य विषयक कामे करणेकरीता ‘शाळा वर्ग खोली’ बांधणे या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 27.72 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रातील प्रवेशव्दार उभारण्याकरीता रु. 4.46 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 पावणे गाव, ऐरोली से.19 आणि सानपाडा से.7 येथील सिताराम मास्तर उद्यान विकसित करणे प्रस्तावित आहे.

 ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे उर्वरित ठिकाणी उद्यान विकासाची कामे पूर्णत्वास आली आहेत.

 नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांचे वार्षिक देखभाल दुरुस्तीचे (AMC) विभागनिहाय काम हाती घेण्यात येत आहे.

 नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रातील संपूर्ण दिवाबत्तीची फिटींग एलईडी करण्याचे प्रस्तावित आहे.

 एम.आय.डी.सी. व डी ब्लॉक मध्ये नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यावर दिवे लावण्याचे प्रस्तावित आहे.

 जुहूगाव येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांकरिता निवासस्थान बांधण्याचे काम प्रस्तावित आहे.

 नेरुळ से.19 येथील यशवंतराव चव्हाण मैदानामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये प्रथमच Bowl skate park विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील skate प्रेमी खेळाडूंना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.

 

  • कामे पूर्ण वा प्रगतीपथावर

 बेलापूर से.3ए, नेरुळ से.9, कोपरखैरणे से.5, ऐरोली से.5 येथील मंगल कार्यालय / बहुउद्देशीय

इमारत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे तसेच वाशी से.14 येथील बहुउद्देशीय इमारत बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

 वाशी से.16ए येथील अग्निशमन केंद्र संकुलातील अग्निशमन कार्यालय इमारतीचे काम पूर्ण झाले आहे.

 तुर्भे माता बाल रुग्णालयाचे (MCH) नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

 से.2 ऐरोली, कुकशेत व करावे येथील नागरी आरोग्य केंद्राचे (UHP) काम पूर्ण झाले आहे.

 शिरवणे कोंडवाड्याच्या जागी बहुउद्देशीय इमारतीचे काम पूर्ण झाले आहे.

 कुकशेत येथे व्यायामशाळेचे काम पूर्ण झाले आहे.

 ऐरोली दिवा सर्कल येथे आगरी कोळी शिल्प उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.

 सी.बी.डी. से.6, नेरुळ से.10, वाशी से.14, कोपरी से.26, ऐरोली से.8 येथे विरंगुळा केंद्र बांधण्यात आले आहे.

 कुकशेत, कोपरखैरणे, घणसोली येथे महिला सक्षमीकरण केंद्र बांधण्यात आले आहे.

 पामबीच रस्त्यावर करावे गावाजवळ भुयारी मार्ग बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.

 बेलापूर से.1ए, नेरुळ से.15, वाशी से.1 ए, सानपाडा से.4, आणि से.14, कोपरखैरणे से.2ए, 3, 8 व 10ए येथे मार्केट बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

 जुईनगर से.24 येथे पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

 तुर्भे से.19 मध्यवर्ती स्मशानभूमी नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर असून दिवा स्मशानभूमीचे काम अंतिम टप्प्यात तसेच गणपतीपाडा व इलठणपाडा दिघा येथील स्मशानभूमीचे काम पूर्णत्वास आले आहे.

 करावे येथे आधुनिक पध्दतीवर गॅस शवदाहिनी सुरु करण्यात आली आहे.

 सानपाडा से.10 सेन्सरी गार्डनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

 कोपरखैरणे निसर्ग उद्यानाजवळ स्वच्छता पार्कचे काम पूर्ण झाले आहे.

 बेलापूर आयकर कॉलनी रेल्वे क्रॉसिंगजवळ पादचारी पूल बांधण्याचे काम पूर्णत्वास आले आहे.

 तुर्भे जनता मार्केट येथे रेल्वे क्रॉसिंग जवळ पादचारी पूलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

 ‘अमृत’ योजनेअंतर्गत ज्वेल ऑफ नवी मुंबई नेरुळ, वाशी से.10ए, 30 आणि घणसोली से.6

येथील हरित क्षेत्र विकसित करण्यात आले आहे.

 राज्य शासनाने रस्ता सुरक्षिततेबाबत आदेशित केल्यानुसार शहरातील रस्ता सुरक्षिततेच्या उपाय योजनांचे सर्व्हेक्षण करण्याचे काम सुरु आहे.

 कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली विभाग कार्यालयाचे काम प्रगतीपथावर आहे.

 घणसोली येथे सेंट्रल पार्कचे काम पूर्ण झाले आहे.

 सी.बी.डी. से.3 गौरव कला केंद्रातील प्रशिक्षण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे.

 नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रातील विविध शाळांमध्ये संगणक कक्ष उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.

 घणसोली विभागामध्ये सिडको हस्तांतरीत पामबीच रस्त्यावर एलईडी फिटींग लावून दिवाबत्तीची

सोय करण्यात आली आहे.

 घणसोली विभागातील सिडको नोड मधील सिडकोने लावलेल्या सोडियम वेपर फिटींग बदली करुन एलईडी फिटींग लावण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

 सिडको हस्तांतरीत भागामध्ये रस्ते, पदपथ, गटार सुधारण्याची कामे मोठ्या प्रमाणात हाती

घेण्यात आली आहेत.

 

 संगणक :-

  नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील मालमत्तांचे Light Detection and Ranging (Lidar) Technology वापरून सर्वेक्षण करणे.   शासनाने स्थानिक संस्था कर रद्द केलेला आहे. त्यामुळे भविष्यात मालमत्ता कर हा एकमेव उत्पन्न देणारा कर असून त्यात वाढ होण्याच्या दृष्टीने महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक मालमत्तेवर योग्य कर लावणे गरजेचे व कायदेशीर आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील मालमत्तांचे Light Detection and Ranging (LiDAR) तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक पध्दतीने सर्वेक्षण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे सर्व्हेक्षण मनपाच्या प्रस्तावित नवीन विकास आराखड्यासाठी उपयोगी पडणार आहे. तसेच या माहितीचा उपयोग नवी मुंबई महानगरपा‍‍लिकाच्या विकास नियोजनाकरिता ऑनलाईन पध्दतीने वापरता येईल.

  नवी मुंबई महानगरपा‍‍लिकाच्या विविध विभागाच्या दैनंदिन कामाकरिता इंन्टिग्रेटेड इंटरप्राईज सोल्युशन विकसित करणे. संगणकीकरण ही आजच्या युगाची गरज असून इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे नागरिकांना नवी मुंबई महानगरपा‍‍लिकेतील विविध सेवा व सुविधा त्वरित, कुठेही व केव्हाही उपलब्ध होऊ शकतात, अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागाचे संगणकीकरण करण्याचे धोरण आखण्यात आले आहे.  महानगरपालिकेशी संबंधित नागरिकांची कामे त्यांना घरी अथवा कार्यालयातून करता यावीत याकरिता ई-गर्व्हन्सच्या प्रभावी अंमलबजावणीवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. या कामांकरिता ‘संगणकीकरण’ या लेखाशिर्षांतर्गत रु. 29.90 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये Surveillance करिता  सी.सी.टि.व्ही यंत्रणा कार्यान्वित करणे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने Surveillance करिता नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी हाय डेफिनेशन कॅमेरे, पीटीझेड कॅमेरे, वाहनांची गती देखरेखीकरिता स्पीडींग कॅमेरे, खाडी व समुद्र किनारे या ठिकाणांवर देखरेखीकरिता  थर्मल कॅमेरे, पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स सुविधा, सार्वजनिक घोषणेकरिता १२६ ठिकाणी  Public Announcement System, डायनॅमिक मेसेजिंग साईन, स्वयंचलित क्रमांक प्लेट ओळख (एएनपीआर) Automatic number plate Recognition/ लायसन्स प्लेट कॅपचरिंग इ. सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.  या कामाकरिता ‘सी.सी.टी.व्ही. स‍िर्व्हलन्स’ या लेखाशिर्षांतर्गत रु. 80 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 

पाणीपुरवठा/मोरबे/मलनि:स्सारण :-

प्रस्तावित कामे :-

  भोकरपाडा येथे 450 द.ल.लि. क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र आहे. या केंद्रात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून बांधण्यात आलेल्या Clari floculater  ची गळती थांबविणे आणि M.S. ब्रीज बदलणेचे रु.6.28 कोटी रक्कमेचे काम मा.सर्वसाधारण सभेकडे प्रस्तावित करणेत आलेले आहे. तसेच जुने Inlet Chember तोडून नवीन Inlet Chember बांधणे प्रस्तावित आहे. त्यासाठी रु. 8.50 कोटी इतका अंदाजीत खर्च येणार आहे. सदरच्या प्रस्तावास मा.सर्वसाधारण सभेने  प्रशासकीय मंजूरी दिली असून निविदा काढण्यात येत आहे.

  पावसाळा कालावधीतील पाताळगंगा नदीचे पाणी उचलून त्यापैकी प्रथम टप्प्यामध्ये 450 द.ल.लि. ते 500 द.ल.लि. क्षमता वाढविण्याचे काम प्रस्तावित करण्यात येत आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास भविष्यकालीन कालावधीत पाणी टंचाई जाणवणार नाही. या कामासाठी अंदाजे रु.282 कोटी रुपये खर्च अपे‍िक्षत आहे.

  सेक्टर 9, नेरूळ येथील जुने जलउदंचन केंद्र तोडून नवीन बांधणे प्रस्तावित आहे. त्यासाठी रु. 1.24 कोटी इतका खर्च अपे‍िक्षत  आहे.

  कोपरखैरणे तीन टाकी येथे 5.00 द.ल.लि. क्षमतेचे दोन भूस्तरीय जलकुंभ बांधणे प्रस्तावित असून, त्यासाठी अंदाजे रु. 20 कोटी इतका खर्च अपे‍िक्षत  आहे.

  सेक्टर -3 ऐरोली येथे 10 द.ल.लि. क्षमतेचे भूस्तरीय जलकुंभ बांधणे प्रस्तावित असून, त्यासाठी रु. 20 कोटी इतका खर्च अपे‍िक्षत  आहे.

  चिंचपाडा, ऐरोली येथे नवीन उच्चस्तरीय/भूस्तरीय जलकुंभ बांधणे प्रस्तावित असून, यासाठी           मा. सर्वसाधारण सभेने रु. 7.50 कोटी एवढया रक्कमेस प्रशासकीय मंजूरी दिली आहे.

  ऐरोली समता नगर येथे 3 द.ल.लि. क्षमतेचा भूस्तरीय जलकुंभ बांधणे प्रस्तावित असून, त्यासाठी        रु. 9.50 कोटी इतका खर्च अपे‍िक्षत  आहे.

  सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकूण आठ मलप्रक्रिया केंद्रात सरासरी 210 द.ल.लि. इतके सांडपाणी प्रक्रियेसाठी उपलब्ध होते.

  ‘अमृत’ योजनेअंतर्गत कोपरखैरणे व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्रांतील प्रक्रियायुक्त सांडपाण्यापैकी 40 द.ल.लि. इतक्या प्रक्रियाकृत सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया (Tertiary Treatment) करुन, सदरचे पाणी महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाला औद्योगिक वापरासाठी पुरविण्यात येणार आहे. या कामाची निविदा  स्विकृत करण्यात आली असून कंत्राटदारास कार्यादेश देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये पुनर्प्रक्रियाकृत पाण्याची मानके प्राप्त करणेसाठी अल्ट्रा फिल्टरेशन + अल्ट्रा व्हायलेट ट्रिटमेंट युनिट उभारणे व अनुषांगिक कामे करण्यात येणार आहेत. यामुळे पुनर्प्रक्रियाकृत पाणी औद्योगिक संस्थांना वापरणे शक्य होणार असून पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे.

  त्याचप्रमाणे नेरुळ से-50 येथील मलप्रक्रीया केंद्रातील प्रक्रियाकृत सांडपाणी उद्यांनाकरिता पुनर्वापर करण्याचे नियोजन असून हा प्रकल्प 5 द.ल.लि. Tertiary Tretment plant based on fibre disc filter यावर आधारित आहे. यामुळे बेलापूर व नेरुळ विभागातील 31 उद्याने तसेच चौक व रस्ता दुभाजकातील झाडे यांना पाणी उपलब्ध होणार असून तेवढेच पाणी वाचणार आहे.

 

  • कामे पू्र्ण वा प्रगतीपथावर

  सन 2018-19 पासून पाणीपुरवठा व मलनि:स्सारण व्यवस्थेच्या सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्तीसाठी पंचवार्षिक कंत्राटे मंजूर करण्यात आलेली आहेत. सर्व विभागातील पाणीपुरवठा  व मलनि:स्सारण व्यवस्थेच्या कंत्राटासाठी Key Performance Indicator (KPI) प्रस्तावित करण्यात आले असून त्यासंबधी डॅशबोर्ड तयार करणे सुरु आहे.

  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मलप्रक्रिया केंद्रांच्या सर्वसमावेशक देखभाल दुरुस्तीसाठी केंद्रनिहाय कंत्राटदार नेमण्यात आलेले आहेत.

 क्षेपणभूमी:-

 नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रात दैनंदिन तयार होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणेकरीता ‘डंपिंग ग्राऊंडची सुधारणा’ या लेखाशिर्षाअंतर्गत रु. 13.62 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

 महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम आणि पाडकामाचा कचरा विल्हेवाट लावणे सर्व स्थानिक संस्थांना बंधनकारक असून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत याविषयी सकारात्मक पाऊल उचलत तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळी C&D waste प्रक्रीया प्रकल्प उभारणे व त्याची 5 वर्ष देखभाल व दुरूस्ती करणे कामास सुरुवात करण्यात येत आहे. याव्दारे शहर अस्वच्छतेवर नियंत्रण राहील व पुनर्वापरामुळे रेती, खडी यांचा वापर कमी होऊन पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टळेल. या प्रकल्पाचा खर्च साधारणत: रु. 8 कोटी आहे.

 शहरात निर्माण होणाऱ्या साधारणत: 55 MT C&D Waste वर 20 MT प्रति तास क्षमतेचा C&D Waste प्रक्रीया प्रकल्प उभारल्याने प्रति दिन 100 ते 150 MT डेब्रीजवर प्रक्रीया करणे शक्य होईल. C&D waste प्रक्रीया करून तयार झालेली खडी व रेती ही महानगरपालिकेमार्फत पदपथ, गटारे, रस्ते बांधकाम करण्याकरिता वापरता येईल व Sludge पासून विटा तयार करता येतील.

 

  1. तुर्भे क्षेपणभूमी येथील घनकचरा प्रक्रीया प्रकल्प सुधारणा करणे. (प्रकल्प खर्च रु. 10.64 कोटी)

 तुर्भे क्षेपणभूमी येथील घनकचरा प्रक्रीया प्रकल्प Upgradation/Retrofitting करुन घनकच-याचे पूर्ण वर्गीकरण करून सर्व Recylable material वेगळे करणे, ओल्या कच-यावर संपूर्ण प्रक्रीया करून खत करणे, Inert Landfill Site मध्ये विल्हेवाट लावणे यांचे पालन होईल.

 ग्रीन वेस्ट पासून Teri या संस्थेमार्फत गॅसिफिकेशन पध्दतीने झाडांच्या फांद्यापासून 100(KW) क्षमतेचा विद्युत निर्मितीचा प्रकल्प उभारणे. ज्यामध्ये, तुर्भे प्रकल्पस्थळी तयार होणा-या आर.डी.एफ. चा वापर होईल व यापासून अंदाजे 7500 ते 10000(KWH) एवढे युनिट वीज तयार होईल व त्याचा वापर तुर्भे क्षेपणभूमी येथे करण्यात येईल. क्षेपणभूमीवर येणा-या ग्रीन वेस्टची शास्त्रोक्तरित्या विल्हेवाट लावणेत येईल.

  1. तुर्भे क्षेपणभूमी येथील पाचवा सेल शास्त्रोक्त पध्दतीने बंद करणे. (प्रकल्प खर्च रु.18 कोटी)

 नवी मुंबई महानगरपालिका तुर्भे क्षेपणभूमी येथे पाचवा सेल हा सन 2012 पासून कार्यरत आहे. सदर सेलची क्षमता जवळ जवळ संपुष्टात आल्याने SWM Rule 2016 प्रमाणे सदरचा सेल शास्त्रोक्त पध्दतीने बंद करणे आवश्यक आहे.

 सदरचे काम पूर्ण झाल्यावर सेलमधून लिचेट पाझरणार नाही, मिथेन गॅसचे विघटन शास्त्रोक्त पध्दतीने होईल.

  1. तुर्भे क्षेपणभूमी येथे MSW Rule 2016 प्रमाणे सहावा सेल विकसित करणे. (प्रकल्प खर्च रु. 2.07 कोटी)

 तुर्भे क्षेपणभूमी येथील कार्यरत असलेल्या पाचव्या सेलची क्षमता संपुष्टात आली असल्याने सहावा सेल MSW Rule 2016 प्रमाणे विकसित केल्याने दैनंदिन नागरी घनकच-याची शास्त्रोक्तरित्या विल्हेवाट लावणे शक्य होईल.

 त्याचप्रमाणे ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करण्यासाठी बायोमिथनायझेशन प्रकल्प उभारणे प्रस्तावित असून त्यामध्ये तयार होणारा मिथेन गॅस नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन बसेस करिता उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे.

  1. निसर्ग उद्यान मधील हिरवळीची वार्षिक देखभाल व दुरूस्ती करणे.

कोपरखैरणे येथील जुनी क्षेपणभूमी शास्त्रोक्त पध्दतीने बंद करून निसर्ग उद्यान तयार करण्यात आलेले आहे. कोपरखैरणे क्षेत्रातील नागरिाक याठिकाणी सकाळ-संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येत असतात. नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याठिकाणी नवीन पदपथ बांधण्याचे नियोजन आहे.

  1. तुर्भे क्षेपणभूमी येथील घनकचरा प्रक्रीया प्रकल्प तृतीय एजन्सीकडून दैनंदिन देखभाल व दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे.
  2. तुर्भे क्षेपणभूमी येथील जमा होणाऱ्या घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीया करून उर्वरीत inert ची सेल मध्ये विल्हेवाटी पश्चात पाझरणा-या लिचेटवर प्रक्रीया करण्याचे काम चालू आहे.

पर्यावरण विभाग :-

  सद्यस्थितीत हवा गुणवत्ता तपासणी करीता ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे, नेरुळ येथे नवी मुंबई महानगरपालिकेची 4 सनियंत्रित हवा गुणवत्ता तपासणी केंद्र कार्यरत असून नेरुळ से-50 आणि महापे औद्योगिक क्षेत्र याठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण मंडळामार्फत केंद्र उभारण्याचे नियोजन केले आहे.

  हवा गुणवत्तेच्या परिक्षणाकरिता फिरत्या पर्यावरण प्रयोगशाळेचा वापर करण्यात येत असून पाण्याची गुणवत्ता तपासण्याकरिता आग्रोळी येथे पर्यावरण प्रयोगशाळा कार्यरत आहे.

  यापुढील काळात शहरातील हवा प्रदूषण तक्रारीचे तात्काळ निदान करण्यासाठी VOC (Volatile Organic Compound) डिटेक्टरकरिता CH4, NH3, H2S, CO, PM 2.5 & 10 प्रदुषकांचे मोजमाप करणारे सेन्सर खरेदी करणे व पाण्याची गुणवत्ता तपासण्याकरिता अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे प्रस्तावित आहे.

  शहरातील वायू प्रदुषण कमी करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने कृती आराखडा तयार केला असून सेन्सर आधारित PUC तपासणी करण्याचे नियोजन आहे.

  याशिवाय इको सिटी प्रकल्प अंतर्गत रेल्वे स्थानकापासून विविध भागात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करणे प्रस्तावित आहे.

  नियोजनानुसार एकूण ५ ते ६ AAQMS ची उभारणी नवी मुंबई शहरात करण्यात येणार आहे. परंतु हवा गुणवत्ता तपासणी साधनांचा खर्च कमी करण्याकरिता सद्यस्थितीत AAQMS यांचा SAFAR उपक्रमांमध्ये अंर्तभाव करण्यात येणार आहे. बेलापूर येथे व २ औद्योगिक क्षेत्रामध्ये नविन AAQMS उभारण्यात येणार आहेत.

  औद्योगिक पट्टा असल्यामुळे किमान मर्क्युरी तपासणी करीता १ केंद्र उभारण्यात येणार आहे.

  रेल्वे स्थानकावर, NMMT बस थांब्यावर LED दर्शक फलक जनतेला आरोग्य विषयक पर्यावरण स्थितीचा आढावा कळण्याकरिता लावण्यात येणार आहेत.

  ध्वनीपातळी कमी करण्याकरिता रस्त्याच्या पृष्ठभागाच्या बांधकामामध्ये एस.एम.ए. (स्टोन मॅस्टीक अस्फाल्ट) सारख्या कमी आवाज सामग्रीचा वापर करण्याचे नियोजन आहे

घनकचरा व्यवस्थापन विभाग :-

 नवी मुंबई महानगरपालिकेस शहरातील स्वच्छता उत्कृष्ट राखल्याबाबत व घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम-2016 ची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यामुळे सन 2018 मध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी देशात पहिला क्रमांक प्राप्त झालेला आहे.

 नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात साधारणत: दैनंदिन 700 MT पेक्षा जास्त कचरा निर्माण होत असून मोठया गृहनिर्माण संस्था, हॉटेल, वाणिज्य संकुले, शैक्षणिक संस्था, औदयोगिक क्षेत्रामध्ये निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इतर ठिकाणचा वर्गीकृत केलेला ओला व सुका कचरा निळया व हिरव्या कचराकुंडयामध्ये ठेवण्यात येऊन कचरा वाहतुक करणाऱ्या वाहनांमार्फत क्षेपणभूमीवर नेण्यात येतो.

 कार्यक्षेत्रातील लहान सोसायट्यांनी व सदनिकांमधील नागरिकांनीही खत टोपली वापरुन घरातील    ओल्या कचऱ्याचे खतामध्ये रुपांतर करणे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

 परिमंडळ-1 व परिमंडळ-2 करिता यांत्रिकी मशिनद्वारे साफसफाई वाहनांवर जी.पी.एस.(VTS) यंत्रणेद्वारे मॅानिटरींग केले जात आहे.

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागाअंतर्गत कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या अशा सुमारे 8700 कंत्राटी कामगार व महापालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांच्यावर प्रभावीपणे नियंत्रण करणेसाठी ITI Ltd (A Govt. of India Undertaking) या कंपनीमार्फत Geo Fencing व Tracking प्रणाली (घडयाळ) राबविण्यात येत आहे.

 नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आधुनिक पध्दतीने जमिनीखाली कचराकुंडया बसवून कचराकुंडीमुक्त शहर करण्यात येणार आहे.

 त्याच बरोबर नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात Side Compactor व्दारे कचरा वाहतुक करण्याचा उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे.

 नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात झोपडपट्टी व गांव-गावठाणांमध्ये Decentralized Composting करण्याचा म्हणजेच या विभागातील कचरा गोळा करुन ओला व सुका कचरा वेगवेगळा करुन, ओल्या कचऱ्याची विल्हेवाट कचरा निर्मितीच्या ठिकाणी करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 कच-यावर जैविक अथवा सेंद्रिय पध्दतीने संस्थेच्या आवारातच प्रक्रिया करणा-या तसेच ऊर्जा व जल संवर्धनाचे उपक्रम राबविणा-या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांकरीता प्रोत्साहनपर अनुदान योजना लागू करण्यात आली असून ही योजना प्रथम दोन वर्षांसाठी म्हणजे सन-2019-2020 व सन-2020-21 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

अ.क्र. गृहनिर्माण संस्था वार्षिक प्रोत्साहन अनुदान रक्कम रुपये
कचरा प्रक्रिया उर्जा व जल संवर्धन उपक्रम एकूण अनुदान रक्कम
1. 500 पेक्षा जास्त सदनिका 25,000/- 25,000/- 50,000/-
2. 200 ते 499 सदनिका 20,000/- 20,000/- 40,000/-
3. 50 ते 199 सदनिका 15,000/- 15,000/- 30,000/-
4. 49 पेक्षा कमी सदनिका 10,000/- 10,000/- 20,000/-

 

  • नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व मोठ्या उद्यानामध्ये कम्पोस्ट पीटस् तयार करण्यात   आले असून त्यामध्ये दररोज सुमारे 10 टन गवत व पाला-पाचोळ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्यात येते.

 

स्वच्छ महाराष्ट्र अभियान :-

  •  केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी)’ राबविण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व राज्य शासनाच्या दिनांक 2015/05/15  रोजीच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)’ बाबतच्या शासन निर्णयानुसार नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मा.आयुक्त यांचे दि.06/08/2015 रोजीचे आदेश क्र.नवी मुंबई महानगरपा‍‍लिका/प्रशासन/आस्था-1/अधि/प्र.क्र.7/2561/2015 अन्वये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ‘प्रकल्प अंमलबजावणी कक्ष’ स्थापन.
  •  ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-2018 मध्ये नवी मुंबई शहरास ‘घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशात सर्वोत्तम शहर’ (India’s Best City in Solid Waste Management) बहुमान प्राप्त झाला असून स्वच्छ शहरांच्या तालिकेमध्ये देशात नवव्या व राज्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे.
  • नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून अनुदानाचा एकूण रु.7.35 कोटी इतका निधी प्राप्त झाला असून माहे डिसेंबर, 2018 पर्यंत रु.4.46 कोटी इतका निधी खर्च करण्यात आलेला आहे.
  •  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात “नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता व साफसफाई उपविधी, 2017” लागू करून सदर उपविधीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास मा. सर्वसाधारण सभेची मंजूरी प्राप्त झाली आहे.
  •  ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत शहर हागणदारी मुक्त करण्याच्या दृष्टीने माहे जुलै-2015 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये 3398 कुटूंबे उघड्यावर शौचास जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार केंद्र व राज्य शासन तसेच महानगरपालिकेमार्फत वितरीत करण्यात आलेल्या अनुदानामध्ये माहे जानेवारी-2019 पर्यंत एकूण 3291 कुटुंबांनी वैयक्तिक घरगुती शौचालय (IHHL) बांधण्यात आली. तसेच CSR अंतर्गत मे. शेल्टर असोसिएट्स,  पुणे यांचेमार्फत बेलापूर विभागातील रमाबाई आंबेडकरनगर येथे 172, कोपरखैरणे विभागातील श्रमिकनगर येथे 66, व ऐरोली विभागातील समता नगर, ऐरोली नाका, साईनाथवाडी व गणपती कॉलनी येथे 514 अशी एकूण 752 वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली.  
  •  तसेच महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी एकूण 540 सामुदायिक शौचालये / सार्वजनिक शौचालये उपलब्ध असून त्यामध्ये 5717 सिट्स (शौचकुपे), 78 स्नानगृहे व 638 मुता-या उपलब्ध आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची सर्वसमावेशक कंत्राट पध्दतीने दैनंदिन साफसफाई, देखभाल व दुरूस्ती करण्याकरीता विभागनिहाय कंत्राटदार नियुक्त करण्यात आलेले आहेत.
  •  नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध 20 ठिकाणी स्मार्ट ई-टॉयलेट व 6 ठिकाणी स्मार्ट शी टॉयलेट उभारण्यात आली आहेत. सदर ‘स्मार्ट शी टॉयलेट’ केवळ महिलांकरीता असून त्यामध्ये सॅनिटरी वेडींग मशिन, इनसिनेटर, आरसा, Baby Feeding Room, Diaper changing Room सहित Rest Room चा अंतर्भाव आहे. सदर उपक्रम देशात तसेच राज्यामध्ये अभिनव असून Smart She Toilet च्या संकल्पनेस शौचालय उत्पादक मे.ईराम सायंटिफीक यांनी ‘NMMC Model’ अशी बिरूदावली प्रसिध्द केलेली आहे.
  •  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहर हागणदारी मुक्त (ODF++) करण्याकरीता ठरवून दिलेल्या निकषानुसार सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांमधील सोई सुविधामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच सर्व शौचालयांना रंगकाम करून परिसर सुशोभिकरण करण्यात आले असून शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत माहे जानेवारी-2019 मध्ये क्वॉलिटी कॉन्सील ऑफ इंडिया (QCI) या त्रयस्त संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शहर हागणदारी मुक्त (ODF++) घोषित करण्यात आले आहे.
  •  स्वच्छ सोसायटी, हॉटेल, हॉस्पिटल, मार्केट, शाळा व स्वच्छ प्रभाग पाच गटांमध्ये स्वच्छता स्पर्धा तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  •  ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत शहरात जनजागृतीसाठी विविध प्रकारचे आकर्षक होर्डिंग-बॅनर्स, हस्तपत्रके वितरण, शालेय विद्यार्थ्यांच्या रॅली व चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, वॉल पेंटींग, पपेट शो, प्रमोशनल कँटर व्हॅनव्दारे जनाजागृती, स्वच्छता मोहिमांचे आयोजन, स्वच्छ सर्वेक्षण-2019 बाबत नमुंमपा सेवातील वाहने व बसेसवर स्टिकर्स लावणे, वॉल पेंटींग करणे असे विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. तसेच महानगरपालिकेमार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर आणि नागरिकांच्या प्रतिसादाकरीता WhatsApp / Facebook / Twiitter / YouTube माध्यमाव्दारे उपलब्ध करून देण्यात आली.
  • ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत कचरा मुक्त शहरांना स्टार रेटींग देण्यात येणार असून त्याकरीता निकष (Key Components) निश्चीत करून दिलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘घनकचरा व्यवस्थापन अधिनियम-2016’ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून शहरात दैनंदिन कचरा संकलन, कचरा वर्गीकरण व शास्त्रोक्त पध्दतीने कच-यावर प्रक्रिया केली जात आहे. तसेच कचरा मुक्त शहराच्या स्टार रेटिंग करीता निश्चित करून दिलेल्या निकषानुसार घनकचरा व्यवस्थापन व अनुषांगिक पायाभूत सोयी-सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई शहरास कचरा मुक्त शहराचे 3 स्टार व 4 स्टार रेटींग प्राप्त करण्यास मा. सर्वसाधारण सभेने मान्यता प्रदान केली असून ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत कचरा मुक्त शहर 3 स्टार मानांकनासाठी सर्वेक्षण समितीमार्फत नवी मुंबई शहराची तपासणी करण्यात आलेली आहे.

 

 उदयान विभाग :-

  •  नवी मुंबई क्षेत्रातील उद्यानांचे अधिक चांगल्या प्रकारे सुशोभिकरण व्हावे, नविन हस्तांतरीत भुखंडावर उद्याने विकसित करणे व शहराचे जास्तीत जास्त क्षेत्र हरित व्हावे आणि शहरातील रस्ता दुभाजक, रस्त्याच्या दुतर्फा तसेच उद्यानांच्या नुतनीकरणावर भर देतांना उद्यानातील हिरवळ व झाडे झुडपे यांची लागवड करणे इत्यादी कामे करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे नव्याने हस्तांतरीत घणसोली नोड मधील 5 उद्याने नव्याने विकसित करणेत आलेली आहेत. शहरातील रस्ता दुभाजकामध्ये शोभिवंत झाडे, झुडपे लावून शहराच्या सुशोभिकरणावर जास्तीत जास्त भर देण्यात आला आहे.
  •  नवी मुंबई क्षेत्रातील उद्याने, रस्ता दुभाजक, ट्रीबेल्ट व मोकळया जागा यांचे संवर्धन व संरक्षण सर्वसमावेशक (Comprehensive) पध्दतीने व्हावे यासाठी परि-1 व परि-2 या क्षेत्रासाठी निविदा प्रसिध्दी करणेत आली आहे. यामुळे सर्व कामे एकाच ठेकेदारामार्फत करून घेता येतील व नागरिकांना अधिक चांगली सुविधा देता येईल.
  •  नवी मुंबई क्षेत्रातील उद्यानांमध्ये नागरिक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना अत्याधुनिक सुविधा देणे याकरीता खेळणी व बेंचेस बसविणे व ओपन जीम साहित्य बसविणेत आले आहे. स्थानिक नागरिकांना या वर्षात उद्यानात ओपन जीम साहित्य उपलब्ध करून दिल्यामुळे आरोग्यविषयक जागरूकता निर्माण झाली आहे. या सुविधेमुळे नागरिकांच्या फिटनेस सेंटर किंवा व्यायाम शाळेसाठी लागणाऱ्या खर्चात बचत झाली आहे.
  •  केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत अभियान’ अंतर्गत ‘हरित क्षेत्र विकास (Green Space Development)’ कार्यक्रम अंतर्गत सन 2015-16, सन 2016-17 व सन 2017-18 या वर्षासाठी केंद्र शासन 50%, राज्य शासन 25%, व महानगरपालिका निधी 25% अनुदान याप्रमाणे सदर कामे पूर्ण झालेली आहेत. तसेच ज्वेल पार्क येथे स्मृती उद्यान विकसित करण्यात येणार आहे.
  •  नवी मुंबई शहरातील मुख्य पामबीच मार्ग रस्ता दुभाजकात शोभिवंत झाडे, झुडपे लावून सुशोभिकरण करण्याचे नियोजन आहे.

 

 आरोग्य  सेवा :-

  • ऐरोली व नेरूळ येथील 100 खाटांचे सार्वजनिक रूग्णालय व बेलापूर येथे 50 खाटांचे माता बाल रुग्णालय कार्यान्वित करण्यात आली आहेत. सदर रूग्णालयांमध्ये मेडिसीन, स्त्रीरोग चिकित्सा व प्रसुती, बालरूग्ण, अस्थिव्यंग रोग, नाक, कान व घसा, मनोविकार, नेत्रशल्य चिकीत्सा इ. बाहयरूग्ण विभाग तसेच स्त्रीरोग, प्रसुती व बालरूग्ण विभाग यांची आंतररूग्ण सेवा सुरू करण्यात आली आहे.
  •  नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांकरीता आतापर्यंत 56 प्रकारची उपकरणे व 88 प्रकारची इन्स्ट्रुमेंटस सेट्स खरेदी करण्यात आलेले असून त्याकरीता रू. 30.11 कोटी इतका खर्च झालेला आहे. तसेच 87 प्रकारची उपकरणे खरेदी करणेकरीता प्रशासकीय मान्यता घेणेचे कार्यालयीन प्रणालीमध्ये असून त्याकरीता अंदाजे रू. 18.17 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. पुढील वर्षाकरीता औषधे खरेदी रू. 10.10 कोटी, सर्जिकल साहित्य खरेदी रू. 4.80 कोटी, पॅथॉलॉजी साहित्य खरेदी रू. 3.86 कोटी अशी प्रशासकीय मंजूरी घेण्यात आलेली आहे.
  •  सार्वजनिक रूग्णालय, नेरूळ व ऐरोली येथे मेडिकल ऑक्सिजन गॅस पाईपलाईन सिस्टिम कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्याव्दारे रूग्णालयांतील विविध विभागांना मेडिकल ऑक्सिजन गॅसचा पुरवठा करण्यात येत आहे. तसेच माता बाल रूग्णालय, बेलापूर व तुर्भे येथे मेडीकल ऑक्सिजन गॅस पाईपलाईन लवकरच कार्यान्वित करण्यात येईल.
  •  सार्वजनिक रूग्णालय वाशी येथे सर्व विभाग कार्यान्वित असल्याने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तसेच पनवेल, उरण, मानखुर्द असे बाहेरील क्षेत्रातील सर्व ठिकाणचे रूग्ण मोठया प्रमाणावर उपचारार्थ येत असतात. तथापि उपलब्ध डॉक्टर्सच्या संख्येत प्रभावी रूग्णसेवा देण्यात अडचणी निर्माण होतात. या बाबींचा विचार करून College of Physicians and Surgeons of Mumbai (CPS) यांचेमार्फत चालविण्यात येणा-या MOHFW, GOI मान्यता प्राप्त  Memebership, Fellowship व Diploma Courses सुरू करण्यात आले असून या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये MBBS पदवी प्राप्त असणारे Resident Doctors 24 तास उपलब्ध होत आहेत. CPS कोर्स अंतर्गत उपलब्ध होणा-या डॉक्टरांचा तपशील खालीलप्रमाणे
अ.क्र. रूग्णालयाचे नाव 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष पुढील प्रत्येक वर्षी
1. सा. रू. वाशी 32 64 72 72
2. सा. रू. ऐरोली 6 12 12 12
3. सा. रू. नेरूळ 6 12 12 12
4. मा.बा. रू. बेलापूर 4 8 8 8

 

  •    सद्यस्थितीत या कोर्स अंतर्गत सार्वजनिक रूग्णालय वाशी, नेरूळ व ऐरोली येथे 34 तज्ञ डॉक्टर्स कार्यरत असून भविष्यात सार्वजनिक रूग्णालय वाशी येथे 72, ऐरोली येथे 12, नेरूळ येथे 12 व मा.बा.रू. बेलापूर येथे 8 असे एकूण 104 MBBS पदवी प्राप्त असणारे Resident Doctors 24 तास रूग्णसेवेकरीता उपलब्ध होतील.
  •  रूग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी स्टाफनर्स/नर्स मिडवाईफ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ई.सी.जी. तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, ऑक्झिलरी नर्स/मिडवाईफ, शस्त्राक्रियागृह सहाय्यक या पदांची  भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून सदयस्थितीत नियुक्ती आदेश देण्याच्या कार्यालयीन प्रणालीत आहे. या भरती प्रक्रियेमुळे 130 स्टाफनर्स/नर्स मिडवाईफ, 4 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 7 ई.सी.जी. तंत्रज्ञ, 3 रक्तपेढी तंत्रज्ञ, 32 ऑक्झिलरी नर्स/मिडवाईफ, 12 शस्त्राक्रियागृह सहाय्यक असे एकूण 188 रूग्णालयीन कर्मचारी उपलब्ध होणार आहेत.
  •  दंत रूग्णांवर उपचार करणेकरीता स्वतंत्र दंत विभाग कार्यान्वित करणे नियोजित असून याबाबत कार्यवाही कार्यालयीन प्रणालीमध्ये आहे.
  •  Geriatric Ward Clinic व हिमोफिलीया/कर्करोग चाचणी कक्ष सुरू करणे प्रस्तावित असून याकरिता रू. 200 लक्ष तरतूद प्रस्तावित आहे.
  •  जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या प्रस्तावानुसार तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 9 महिने ते 15 वर्षाचे आतील बालकांना टायफॉईड लस देऊन त्यांना संरक्षित करणे व या वयोगटातील बालकांमधील टायफॉईड आजाराचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने माहे जुलै ते ऑगस्ट 2018 या कालावधीत टायफॉईड लसीकरण मोहिम राबविण्यात आली. टायफॉईड लसीकरण मोहीम राबविणारी नवी मुंबई महानगरपालिका ही जगातील पहिली महानगरपालिका आहे. सदर मोहीमेमध्ये दि.14/07/2018 ते 25/08/2018 या कालावधीत एकूण 1518 बूथ स्थापन करून एकूण 113420 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आली.
  •  नवी मुंबई महानगरपालिका रूग्णालयांमध्ये प्रसुती होणा-या बालकांना नवजात शिशू संगोपन किट New born baby care kit वाटप करणे प्रस्तावित असून त्याकरीता रू. 2 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
  •  सार्वजनिक रूग्णालय नेरूळ व ऐरोली येथे बाहय यंत्रणेदवारे डायलेसिस सुविधा उपलब्ध होण्यासाठी निविदा प्रक्रिया कार्यालयीन प्रणालीमध्ये असून रू. 1.50 कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
  •  गोवर आजाराचे निर्मुलन व रूबेला आजाराचे नियंत्रण करण्यासाठी गोवर रूबेला लसीकरण मोहिम दि. 27 नोव्हेंबर 2018 पासून नमुंमपा कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे.
  •  नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुकशेत व करावे नव्याने बांधून कार्यान्वित करण्यात आली आहेत.

 

ईटीसी अपंग शिक्षणप्रशिक्षण  सेवासुविधा केंद्र :-

  • दिव्यांग मुले तथा व्यक्तीच्या मनातील भावनांकडे आपुलकीने बघत ईटीसी-अपंग शिक्षण,प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र हा स्वतंत्र विभाग स्थापन करणारी नवी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. सर्व वयोगटातील सर्व प्रकारच्या अपंग प्रवर्गातील
    शिशु बालके व व्यक्तींना एकाच ठिकाणी विविध सुविधा पुरविणारे देशातील हे एकमेव केंद्र आहे.
  • ‘नमुंमपा स्विकार’ या मोहीमेअंतर्गत नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींची नाव नोंदणी मोहिम सुरु करण्यात येऊन त्यादवारे जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळवून देण्याचे नवी मुंबई महानगरपा‍‍लिकेचे धोरण आहे.
  • दिव्यांग मुले व व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सुविधा देणारी संस्था म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने
    सन्मानित करण्यात आलेले असून सन 2017-18 चा सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच हुडकोमार्फत सर्वोत्तम कार्यप्रणाली राबविणारी सर्वोत्कृष्ट संस्थेचा
    सन 2018-19  चा  पुरस्कार  प्राप्त झाला आहे.
  • दिव्यांग व्यक्तींकरीता हायड्रोथेरपी/ एक्वाथेपरी उपचारपध्दती सुरु करण्यात आली असून उपलब्ध माहितीनुसार शासकीय उपक्रमामध्ये पहिल्यांदा सदरची उपचारपध्दती नवी मुंबई महानगरपा‍‍लिका  ईटीसी  केंद्रामध्ये  सुरु करण्यात आलेली आहे.
  • नवी मुंबई महानगरपा‍‍लिका  व अशासकीय  संस्था यांच्या संयुक्त विद्ममाने  ‘एक्सप्रिन्शिअल लर्निंग’ प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आलेले  असून 125 दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येऊन 40  दिव्यांग   व्यक्तींना   कायमस्वरुपी   नोकरीच्या  माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
  • अभियांत्रिकी विभाग व नवी मुंबई महानगरपा‍‍लिका ईटीसी केंद्राव्दारे नाविन्यपूर्ण असे दिव्यांगांकरीता सेन्सरी गार्डनची निर्मिती करण्यात आलेली आहे.
  •  दिव्यांग मुलांच्या पालकांकरीता तसेच शिक्षकांकरीता ‘अलीबाबा व चार मित्र’ या सहा पुस्तकी संचाची निर्मिती करण्यात येऊन संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग शाळांना वितरीत करण्यात आलेले असून प्रथमत:
    अशा नाविन्यपूर्ण
    प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविण्यात आलेला आहे.
  •  नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रातील प्रतिक्षा यादीमधील दिव्यांग मुलांना लवकरात लवकर शिक्षण, प्रशिक्षणाचा लाभ मिळावा याकरीता नवी मुंबई महानगरपा‍‍लिकेमार्फत दोन उपकेंद्रे सुरु करण्याचे काम अंतिम टप्यात आलेले असून सन 2019-20 मध्ये दिव्यांग व्यक्तींच्या सेवेकरीता सुरु करण्यात येणार आहेत.
  •  वाचन संस्कृती रुजविण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असताना अंध व इतर दिव्यांग वाचनप्रेमी व्यक्तींना पूरक व उच्च शैक्षणिक पुस्तके उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपा‍‍लिकेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या 13 ग्रंथालयांमध्ये ईटीसी केंद्र तसेच समाज विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र कक्षासहीत आधुनिक ग्रंथ सेवासुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे.
  • नवी मुंबई महानगरपा‍‍लिका ईटीसी केंद्रामध्ये अंध दिव्यांग व्यक्तींकरीता अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त रिसोर्स सेंटर सुरु करण्याचे मानस आहे.
  • सन 2019-20 मध्ये आरोग्य विभाग व ईटीसी केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्व त्वरित निदान व उपचार उपक्रम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.
  •  दिव्यांगांसाठी नव्याने काही महत्वपूर्ण योजना सुरु करणे व त्या ऑनलाईन कार्यान्वित करणे याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत.

 

क्रीडा व सांस्कृतिक विभाग

  • नवी मुंबई शहरातील उद्‌योन्मुख खेळाडू व कलाकारांना त्यांचे क्रीडा कौशल्य व कलागुण विकसित करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता सांस्कृतिक कार्यक्रम/उपक्रम राबविणे तसेच मुलभूत आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देणे अत्यावश्यक आहे. त्याबरोबरच मैदानांचा विकास व क्रीडा प्रशिक्षणावर भर देऊन नवी मुंबई शहराला क्रीडा व सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण करणेकरीता नियोजनबध्द काम करण्यात येत आहे.
  •  क्रीडा व सांस्कृतिक विभागाकडे क्रिकेट खेळाकरीता- 2, तायक्वाँदो करीता- 1, बुध्दीबळ करीता- 1, कबड्डी करीता-1 असे एकूण 5 क्रीडा मार्गदर्शक नियुक्त करण्यात आले असून खेळाडूंच्या फिटनेस करीता-1 फिटनेस ट्रेनर कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त केलेले आहेत.
  •  नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील विविध खेळांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करणा-या खेळाडूंना यापुर्वी  राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा ‍शिष्यवृत्ती लागू होती त्यामध्ये जिल्हास्तरापासूनच खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे याकरीता क्रीडा शिष्यवृत्ती लागू करुन पूर्वीच्या क्रीडा शिष्यवृत्ती रक्कमेत 25% वाढ करण्‍यात आलेली आहे.
  •  नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील साहसी खेळ प्रकारात सहभागी होणा-या खेळाडूंना रु.20 ते 40 हजारापर्यंत अर्थसहाय्य देण्याबाबतचे नाविन्यपूर्ण धोरण लागू करण्यात आलेले आहे.
  •  भारतरत्न स्व.राजीव गांधी क्रीडा संकुलात अद्ययावत अशी व्यायामशाळा तयार करण्यात आली असून त्याठिकाणी संपूर्ण व्यायाम साहित्य उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
  •  क्रीडा विभागातील विविध मैदानांचे आरक्षण पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्यात आलेली आहे. यशवंतराव चव्हाण फुटबॉल मैदानाचे आरक्षण व राजीव गांधी क्रीडा संकुलाचे आरक्षण त्या पध्दतीने करण्यात येणार आहे.
  •  नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घणसोली सेक्टर-3 येथे नव्याने विकसीत करण्यात आलेल्या सेंट्रल पार्क येथे तरणतलाव, स्केटींग रिंग, नेटसह फुटबॉल व ‍क्रिकेट क्षेत्र विकसीत करण्यात आले असून त्याचा नवी मुंबई कार्यक्षत्रातील खेळाडूंकरीता उत्तमरित्या उपयोग होणार आहे.
  •  सांस्कृतिक विभागाच्या वतीने सन्मा.महापौर यांच्या पदनामाने विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धा, एकपात्री ‍अभिनय स्पर्धा, ब्रास बँन्ड स्पर्धा, नृत्य व गायन स्पर्धांचे नियोजन करण्यात आले आहे.
  •  जानेवारी 2019 मध्ये पुणे येथे बालेवाडी क्रीडा संकुलात पार पाडलेल्या केंद्र शासनाच्या ‘खेलो ‍ इंडिया 2018-19’ मध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटात खो-खो या खेळात नमुंमपा शाळेतील विद्यार्थिनी कु अश्विनी मोरे हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करुन सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे.

 

 वाहन विभाग :-

  •   नवी मुंबई महानगरपालिकेकडील रूग्ण्वाहिका, वॉटर टॅंकर, जेटिंग व सक्शन युनिट व लॅडर व्हॅन इत्यादी वाहनांना GPS Vehicle Tracking System बसविण्यात आलेली आहे.
  •   शहर अभियंता पर्यावरण विभागाकरीता एक नवीन फिरती पर्यावरण प्रयोगशाळा खरेदी  प्रस्तावित आहे.

 

समाजविकास विभाग/महिला  बालकल्याण विभाग :-

  •  शहरातील बेघर, सार्वजनिक ठिकाणी वास्तव्य करणा-या नागरिकांसाठी कोपरखैरणे व घणसोली या 2 ठिकाणी रात्र निवारा केंद्र प्रस्तावित असून घणसोली केंद्राचे काम सप्टेंबर 2019 पर्यंत पूर्ण होईल व कोपरखैरणे केंद्राचा Detail Project Report (DPR)  मंजूरीसाठी नगरपालिका प्रशासन संचालनालय यांचेकडे सादर करण्यात आलेला आहे. सदयस्थितीत बेलापूर सेक्टर-11 येथील उड्डाणपुलाखाली 75 व्यक्तींच्या क्षमतेचे रात्रनिवारा केंद्र कार्यान्वित आहे.
  •  सर्व विभाग कार्यालयांमध्ये महिलांसाठी ‘हिरकणी कक्ष’ सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत बेलापूर विभाग कार्यालय या ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे.
  •  प्लॉट नं.9, से.10 कोपरखैरणे या ठिकाणी आदित्य बिर्ला स्किल फाऊंडेशन या संस्थेच्या बीट्स या प्रशिक्षण संस्थेमार्फत उच्च प्रतीचे कौशल्य प्रशिक्षण विकास केंद्र सुरु करुन नवी मुंबई महानगरपा‍‍लिका कार्यक्षेत्रातील 18 वर्षावरील महिला व मुलींकरिता सध्याच्या बाजारपेठेचा अभ्यास करुन रिटेल स्टोअर असोशिएट, फायनान्शियल सर्व्हिसेस असिस्टंट, पेशंट केअर असिस्टंट असे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वर्षभरात तिन्ही प्रशिक्षणाकरिता पहिल्या वर्षात 100, दुसऱ्या वर्षात 200 व तिसऱ्या वर्षात 300 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देऊन महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने चालना देण्यात येईल.
  •  सर्व ग्रंथालयामध्ये ई–लायब्ररी संगणक प्रणाली प्रस्तावित असून संगणक प्रणालीमध्ये नोंदी घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
  •  महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांतर्गत 3831 लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे व 28579 लाभार्थ्यांना लाभ देण्याचे प्रस्तावित आहे.
  •  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांकरीता 25 ठिकाणी कर्करोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे व यामध्ये 979 एवढ्या महिलांनी त्याचा लाभ घेतलेला आहे.
  •  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील युवक–युवतींकरीता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, व्यसनमुक्ती शिबीराचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे.
  •  दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 15 जानेवारी 2019 रोजी वाशी मध्ये रोजगार मेळावा आणि मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये IT, BPO, Banking अशा प्रचलित क्षेत्रातील 65 नामांकीत कंपन्यांनी सहभाग घेतला होता. 4400 हून अधिक युवकांनी या मेळाव्यात नोंदणी केली. यामध्ये 700 युवक-युवतींना नियुक्तीपत्रे व 800 युवक-युवतींना निवडपत्रे देण्यात आली.
  •  वयात आलेल्या मुला–मुलींमध्ये विविध समस्यांबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने ‘तारुण्यभान’ या विषयी शिबीराचे आयोजन दि.21 ते 23 फेब्रुवारी 2019 या कालावधीमध्ये आयोजित केले आहे.
  •  लेक वाचवा लेक शिकवा अभियान अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात 56 ठिकाणी पथनाट्याचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे.
  •  महानगरपालिकेमार्फत सद्यस्थितीत 13 ग्रंथालये व अभ्यासिका कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त 5 ग्रंथालय व अभ्यासिका सुरु करण्याचे नियोजन आहे. (शिरवणे, घणसोली, वाशी, बेलापूर व नेरुळ)
  •  महानगरपालिका क्षेत्रामध्ये 100 शाळा – महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्याचे प्रस्तावित आहे.
  •  कै. गौरव म्हात्रे कलाकेंद्र वाचनालय इमारतीमध्ये यु.पी.एस.सी./एम.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरु करणेकरीता मा. महासभेने मंजूरी दिलेली आहे व त्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.
  •  महानगरपालिका क्षेत्रामधील स्थानिक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील इ. 12 वी नंतरचे वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक या विषयामधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी तसेच व्यवस्थापन शास्त्र विषयांमधील पदव्युत्तर पदवी/पदविका यासारखे पूर्ण वेळ शिक्षण घेत असलेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क किंवा रु. 25 हजार यापेक्षा जी रक्कम कमी असेल अशा शैक्षणिक शुल्काचे अर्थसहाय्य देण्याची अभिनव योजना राबविण्यात येत आहे.

 

अग्निशमन विभाग :-

  •  नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रातील उंच इमारतींमध्ये फायर फायटींग व बचावकार्य करण्यासाठी 01 नग  Arial Ladder Platform, 90 mtr. उंचीचे वाहन व 01 नग  Turn Table Ladder, 68 mtr. उंचीचे वाहन खरेदी करणे प्रस्तावित आहे.
  •  नवी मुंबई महानगरपा‍‍लिका क्षेत्रातील बहुतांश उंच इमारतींभोवती अरुंद रस्ते असल्याने, या ठिकाणी फायर फायटींग करण्याकरिता नवीन तंत्रज्ञान असलेले 68mtr. उंचीचे Tower Monitor सध्या बाजारात उपलब्ध असून, सदरचे वाहन उंच इमारतींमध्ये फायर फायटींग करण्यासाठी अत्यंत उपयोगी असल्याने हे वाहन खरेदी करणे प्रस्तावित आहे.
  •  अग्निशमन केंद्र, सीबीडी व नेरुळसाठी प्रत्येकी 01 नग अशी एकूण 02 नग रेस्क्यू टेंडर वाहने खरेदी करणे प्रस्तावित आहे.
  • नवी मुंबई महानगरपा‍‍लिका कार्यक्षेत्रातील प्राप्त वर्दीच्या ठिकाणी पंप, जवान व इतर रेस्क्यू साहित्य ने-आण करण्याकरिता 02 नग Pickup Van (Utility Vehicle) खरेदी करणे प्रस्तावित आहे.
  • अशी वाहने खरेदी करणेकरिता सन 2019-2020 या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकामध्ये ‘वाहने खरेदी’ या लेखाशिर्षाअंतर्गत एकूण रु. 20 कोटी एवढी तरतूद प्रस्तावित आहे.
  • पावसाळा कालावधीमध्ये इमारत कोसळणे व डोंगरावरील माती खचणे अशा प्रकारच्या दुर्घटनेमध्ये अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याकरिता 1 नग Life Detector Camera खरेदी करणे प्रस्तावित आहे.
  • यंत्रसामुग्री खरेदी करणेकरिता सन 2019-20 या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकामध्ये यंत्रसामुग्री खरेदी या लेखाशिर्षांतर्गत एकूण वार्षिक अंदाजपत्रक रक्कम रु. 7.77 कोटी एवढी तरतूद ठेवण्यात आलेली आहे.
  • नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागांतर्गत से.1ए, कोपरखैरणे येथे नवीन अग्निशमन केंद्र सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सदर अग्निशमन केंद्रासाठी ‘X’ टाईप फायर इंजिन-01 नग, मिनी फायर इंजिन-01 नग, वॉटर बाऊझर-01 नग, रेस्क्यू टेंडर-01 नग व जीप-01 नग अशी एकूण 05 नग नवीन वाहने खरेदीचे कार्यादेश देण्यात आले असून त्यापैकी ‘X’ टाईप फायर इंजिन-01 नग व मिनी फायर इंजिन-01 नग अशी दोन वाहने प्राप्त झालेली असून उर्वरीत-03 गाड्या लवकरच अग्निशमन केंद्रात दाखल होतील.
  • सर्व अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक अधिकारी-कर्मचारी यांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यात 260 नवीन अधिकारी-कर्मचारी भरण्याचे प्रस्तावित आहे. सदर प्रक्रिया पूर्ण होऊन महिन्याभरात नवीन कर्मचारी वर्ग उपलब्ध होतील.

 

 शिक्षण विभाग :

  • नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत 53 प्राथमिक शाळा व 18 माध्यमिक शाळा कार्यरत असून प्राथमिक शाळांशी संलग्न 53 बालवाडी कार्यरत असून बालवाडी विभागात 6460 विदयार्थी, प्राथमिक
    विभागात 29716 विदयार्थी व माध्यमिक विभागात 5130 विदयार्थी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घेत आहेत.
  • नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत नेरुळ, सेक्टर-50 व कोपरखैरणे, सेक्टर-11 येथे सीबीएसई  बोर्डाशी संलग्न शाळा शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून इयत्ता पहिलीच्या वर्गाने सुरु करण्यात आल्या असून
    सदर शाळांतील प्रवेशाबाबत पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लक्षात घेता शैक्षणिक वर्ष सन 2019-20 मध्ये सदर शाळांमध्ये नर्सरी, ज्युनिअर के.जी. व सीनिअर के.जी. चे वर्ग देखील सुरू करण्यात येत आहेत. राज्यात सर्वप्रथम सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्याचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेने संपादन केलेला आहे.
  • शासनाच्या मान्यतेने शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून पावणे गांव येथे नमुंमपा माध्यमिक विदयालय सुरु करण्यात आले आहे
  •  नवी मुंबई महानगरपालिकेने “शाळा व्हिजन” हाती घेऊन सुसज्ज अशा शाळा इमारती बांधलेल्या आहेत. या शाळांमध्ये आरोग्यदायी वातावरण व गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण दिले जात असून सर्व 73 शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा 572 दृकश्राव्य वर्गखोल्यांची निर्मिती, 580 संगणक व सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, e-content अभ्यासक्रमासह प्रोजेक्टर व  स्मार्ट बोर्ड बसविणेत आले आहेत. तसेच ‘रोबीटिक्स’ या नवीन तंत्रज्ञानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचे नियोजन आहे. यामुळे प्रभावी अध्यापन होऊन विद्यार्थ्यांच्या संकल्पना अधिक सुस्पष्ट होणार आहेत.  तसेच सर्व शाळांमध्ये प्रत्येक वर्गखोलीत बायोमॅट्रीक मशिन्स, इंटरनेट व वाय-फाय सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  इंग्रजी विषयाचे कौशल्य विकसित होणेकरिता Cambridge University Press चे दर्जेदार साहित्य वापरून प्रत्येक शाळेत Language Lab ची निर्मिती करणेत आलेली आहे. अध्यापनाला या नवीन तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भरीव वाढ अपेक्षित आहे.
  • शाळांमधील सर्व वर्गखोल्या 100% डिजिटल करणारी नवी मुंबई महानगरपालिका ही राज्यात एकमेव महानगरपालिका आहे.
  •   नमुंमपा शिक्षण विभागामार्फत रात्र कनिष्ठ महाविद्यालय कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे.
  •  शालेय विदयार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे कार्यप्रणालीत आहे.
  •  बालवाडी ते इयत्ता 10 वी च्या विदयार्थ्यांचा अपघाती विमा उतरविण्यांत आलेला आहे. सन 2019-20 पासून अपघाती विम्यापासून मिळणाया लाभाची रक्कम दुप्पट करण्यात आलेली आहे.
  •  नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विदयार्थ्यांना जगातील चालू घडामोडींचे ज्ञान व्हावे तसेच त्यांच्यामध्ये वर्तमानपत्र वाचण्याची आवड रूजावी, याशिवाय इंग्रजी भाषेवर प्रभुत्व निर्माण व्हावे याकरिता
    प्रत्येक शाळांमधील इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांकरीता ‘द हिंदू’  इंग्रजी वर्तमानपत्र पुरविण्यांत येते.
  •  अध्ययन अक्षमता असलेली मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहातून बाहेर पडू नये यासाठी शिक्षक प्रशिक्षण व विशेष शिक्षकांचे सहाय्य घेऊन त्यांना मूळ प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत
    विविध उपक्रम राबविण्यात येतात.
  •  नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक शाळांतील इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी सन 2018-19 या वर्षात इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तीन विषयासाठी तंत्रमार्गदर्शकाकडून SSC Excellence Lectures
    हा लाईव्ह व्हर्च्युअल क्लासरूमचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होणार असून त्यायोगे शालांत परीक्षेचा निकाल उंचावण्यास मदत होणार आहे.

 

 परिवहन उपक्रम :-

  •  सन 2018-19 मध्ये फेब्रुवारी 2019 पर्यंत नवी मुंबई मधील प्रवाशी महिलांसाठी 10 तेजस्विनी बसेस शासनाच्या निधीमधून  उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  सदर बस संपूर्णत: महिलांसाठी  वापरण्यात  येणार   असून  सदर बसेसची रंगसंगती वेगळी ठेवण्यात आली आहे. या बसेस स्वयंचलित गिअर पद्धतीच्या असून त्या महिला चालक व वाहक यांच्या मार्फत चालविण्यात येणार आहेत. या तेजस्विनी बसेसमुळे महिलांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. तसेच सन 2019-20 मध्ये प्रवाशी हितार्थ 25 नवीन बसेस खरेदी करून बस ताफ्यात वाढ करण्यात येणार आहे.
  •  परिवहन उपक्रम स्वयंपूर्ण स्वावलंबी होण्यासाठी वाशी सेक्टर 9, वाशी सेक्टर 12 येथील बस स्थानकाचा वाणिज्यक विकासाचा शुभारंभ करण्यात येणार असून त्या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत उभारून उप्रक्रमासाठी बाह्य उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यात येणार आहे.
  •  परिवहन उपक्रमामार्फत ITMS प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली असून या प्रणालीस केंद्र सरकारच्या Ministry of Housing & Urban Affairs यांच्या तर्फे दिला जाणारा Commendable Initiative Best Intelligent Transport System Project व्दारे या संस्थेमार्फत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास सन 2018 करिता या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  पुढील आर्थिक वर्षात ITMS प्रणाली अंतर्गत Cashless Transaction ला वाव देण्यासाठी Common Mobility साठी आवश्यक SMART CARD विकसित केलेले असून थोडयाच दिवसात त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे, याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
  • नवी मुंबई शहराची माहिती, शहाराचे सांस्कृतिक दर्शन तसेच जनहितार्थ संदेश परिवहन उपक्रमाच्या बसेसव्दारे प्रसारित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सन 2018 मध्ये खरेदी करण्यात आलेल्या नवीन आयशर बसेसच्या दोन्ही बाजूंवर रेडीयम कलरच्या रंगसंगती वापरून नवी मुंबई शहराचा विकास कशा प्रकारे झाला याचे संकल्पचित्र दाखविताना स्थानिक संस्कृतीचे दर्शन, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 आपत्ती व्यवस्थापन विभाग :-

  • महानगरपालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम करण्याच्या दृष्टीने आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष अद्ययावत करणे, आपत्कालीन परिस्थितीत शोध व सुटका बचाव गटासाठी आवश्यक साधन सामुग्री खरेदी करणे, अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण, जनजागृती, आपत्ती धोके विश्लेषण, आपत्ती व्यवस्थापन आराखडा परीक्षण व सुधारणा या महत्वाच्या बाबींकरीता अंदाजपत्रकात रू. 8.43 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
  • भारत सरकार – यु.एन.डी.पी. (UNDP) यांचेमार्फत आपत्कालीन परिस्थितीत शहराची संवेदन क्षमता व लवचिकता टिकविण्यासाठी नवी मुंबईची ‘रिझलन्ट सिटी’ प्रकल्पाअंतर्गत निवड करण्यात आली असून सध्या सन 2017 ते 2020 असे चार वर्षांसाठी प्रकल्प कार्यान्वित आहे.
  • यु.एन.डी.पी. (UNDP) यांचेमार्फत शहराचा विविध आपत्तीमध्ये प्रतिकार क्षमता घटक वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या विविध प्रकल्पांची ओळख आणि अंमलबजावणी करण्याच्या तांत्रिक कौशल्याचा विकास करणे गरजेचे असल्यामुळे, यूएनडीपी औपचारिक भागीदारी करारानुसार नमुंमपाला सहाय्य करण्यास इच्छुक असल्याचे कळविलेले आहे.
  • शहराची लवचिकता तयार करण्यासाठी तांत्रिक मदत पुरविण्याकरीता यूएनडीपी नवी मुंबई महानगरपालिकेचा नॉलेज पार्टनर होण्यासाठी इच्छुक आहे. त्यानुसार त्यांनी सादर केलेल्या प्रकल्पात खालील बाबी/आराखडे प्रस्तावित आहे.
  1. सर्वसमावेशक शाळा सुरक्षा कार्यक्रम.
  2. हॉस्पिटल सुरक्षा कार्यक्रम.
  3. आणीबाणीला मदत करणाऱ्या कार्यकारी अधिकाऱ्यांचे क्षमता संवर्धन(एन.एम.एम.सी.मधील केंद्रीय विभागातील अधिकारी)
  4. नवी मुंबईच्या सागरी/ मच्छीमार समाजांसाठी समाजावर आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प
  5. प्रभाग पातळीवरचा डीएम प्लॅन तयार करणे
  6. रासायनिक आणि औद्योगिक एचव्हीआरए
  7. डिजीटल धोका नकाशा आणि डेटाबेस – निर्णय सहाय्य प्रणाली
  8. इओसी स्थापन करणे
  • सदर प्रकल्प यु.एन.डी.पी. (UNDP) च्या तांत्रिक मदतीने करण्याचे प्रस्तावित असून दोन वर्षाच्या आराखडयानुसार सन 2019-20 या पहिल्या वर्षात रू. 1.61 कोटी व सन 2020-21 या दुसऱ्या वर्षात साधारणत: रू. 2.19 कोटी अशा एकूण रु. 3.80 कोटी रकमेची तरतूद करण्यात येणार आहे.

 

परिमंडळ-1/2:-

  • नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक उत्सवाच्या वेळी रस्ता व पदपथावर तात्पुरता मंडप उभारल्यानंतर वाहतूक सुरळीत रहावी व नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये तसेच ध्वनी प्रदूषणाबाबत नागरिकांच्या तक्रारींचे तत्परतेने निवारण व्हावे याकरिता मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेमार्फत “ई–सेवा संगणक प्रणाली” तयार करण्यात आली. सदर संगणक प्रणालीचे प्रशिक्षण मंडळांचे पदाधिकारी, स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल व महापालिका अधिकारी/कर्मचारी यांना देण्यात येऊन या “ई–सेवा संगणक प्रणाली” व्दारे सन 2018 मध्ये गणेशोत्सवासाठी एकूण 208 व नवरात्रौत्सवासाठी 157 ऑनलाईन परवानग्या देण्यात आल्या. सदर प्रणालीस सार्वजनिक गणेशोत्सव व नवरौत्रौत्सव मंडळाकडून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर सदर संगणक प्रणाली
    संपूर्ण राज्यामध्ये राबविण्याबाबत मा.उच्च न्यायालयाने निदेर्शित केलेले आहे.
  • महानगर गॅस लिमिटेड, मुंबई यांच्यासमवेत झालेल्या करारानुसार महापालिका क्षेत्रातील 15 स्मशानभूमीमध्ये पारंपारिक शवदाहिनीचे PNG (Pipe Natural Gas) गॅस  शवदाहिनीमध्ये  बदल  व सदर शवदाहिनी  करीता गॅस पुरवठा करुन पर्यावरणपूरक अंत्यविधी प्रक्रिया बेलापूर विभागातील करावे येथील स्मशानभूमीमध्ये कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. या गॅस शवदाहिनीमुळे विजेची बचत  होवून  दहनविधी  होण्याअगोदर  650 अंश सेल्सियश तापमानात 90 मिनीटांत दहन प्रक्रिया पूर्ण होते.
  • सदर प्रणालीस नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

नगरसेवक स्वेच्छा निधी  प्रभाग समिती निधी :- 

  • प्रभागातील नागरी विकास कामांकरीता आग्रही असणा-या सन्माननीय नगरसेवकांच्या पाठपुराव्याचा विचार करुन नागरिकांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात सन 2019-20 वर्षाकरीता प्रति नगरसेवक रु. 10 लक्ष प्रमाणे नगरसेवक स्वेच्छा निधी व प्रति नगरसेवक रु. 50 लक्ष प्रभाग निधी अशाप्रकारे स्वतंत्ररित्या तरतूद करण्यात आलेली आहे.  याव्दारे मा. नगरसेवकांना प्रभागामधील अत्यावश्यक व गरजेची कामे त्वरीत करणे शक्य होईल. सन 2018-19 या वर्षात विकास
    निधीची 1376 कामे रक्कम रु. 60.72 कोटी व नगरसेवक निधीची 340 कामे रक्कम रु 6.38 कोटी लक्ष मंजूर झाली आहेत.
  • मागील वर्षाच्या अंदाजातील अपेक्षित उत्पन्नापेक्षा प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या उत्पन्नाचा विचार करुन नवी मुंबई शहरातील प्रत्येक नागरिकाला अभिप्रेत असणारे अत्याधुनिक शहर साकारण्यासाठी या
    अंदाजात प्राधान्य देण्यात आले आहे.
  • याकरिता स्वच्छता व आरोग्य यांची परस्पर पुरकता लक्षात घेऊन शहर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. यादृष्टीने स्वच्छता ही सर्वेक्षणापुरती मर्यादित न राहता ती नागरिकांची नियमित सवय व्हावी यादृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात असून स्वच्छता विषयक उपक्रमांत नागरिकांचा सक्रीय सहभाग घेण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यामध्ये विशेषत्वाने लहान वयापासूनच स्वच्छतेचा संस्कार केल्यास शहराचे उद्याचे भविष्य उज्ज्वल असेल यादृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये ‘स्वच्छता सैनिक’ हि संकल्पना रुजविण्यावर भर देण्यात येत आहे. नवी मुंबई शहरात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी व यामधून शहराचे आरोग्यमान सुधारावे याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासोबतच सायकलसारख्या प्रदूषणविरहित वाहनाला प्रोत्साहन, जैवविविधतेच्या जपणुकीसाठी प्रयत्न, वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन आदी गोष्टीतून पर्यावरण संवर्धनावर भर देण्यात येत आहे.
  • नवी मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये नवी मुंबईकर नागरिकांनी नेहमीच अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली असून यापुढील काळात नागरिकांचा शहरविकासात प्रत्यक्ष सहभाग असण्याकडे अधिक लक्ष देण्यात येईल. यामध्ये महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय, दुर्बल घटक आणि दिव्यांग व्यक्ती यांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना, उपक्रम राबविले जात असून शहराचे भविष्य असणाऱ्या युवा पिढीला  योग्य दिशा मिळावी  याकरीता स्पर्धापरीक्षा , मार्गदर्शन, अभ्यासकेंद्रे व पुरक सुविधा उपलब्ध करुन देणे त्यासोबतच रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे.
  • नवी मुंबई महानगरपालिका विविध नागरी सुविधांबद्दल नेहमीच अनेक आंतरराष्ट्रीय, राज्य पुरस्कारांनी नावाजली गेली आहे. त्यामध्ये आणखी एक विशेष म्हणजे इंडिया रेटिंग अँड रिसर्च या मान्यताप्राप्त संस्थेने  महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेऊन AA+ स्टेबल पत मानांकन यावर्षीही प्रदान केले आहे. असे  उच्च प्रतिचे आर्थिक मानांकन  सातत्याने प्राप्त  करणारी  नवी  मुंबई  ही देशातील  अग्रणी महानगरपालिका  आहे हे अभिमानाने  नमूद करण्यास आनंद होत आहे.
  • नवी मुंबई महानगरपालिकेचे अंदाज तयार करण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व विभागप्रमुख यांचा मौलिक हातभार लागला आहे. सदर अंदाजाची  अंमलबजावणी करण्यात  महानगरपालिकेचे सर्व विभाग  प्रमुख, अधिकारी व कर्मचारी अथक कार्यरत राहतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
  • उपरोक्त सर्व बाबींचा समावेश असलेले व मागील अंदाजाची उद्दिष्टपूर्ती करणारे आरंभीची शिल्लक रु. 1507.57 कोटी व रु. 2113.51 कोटी जमेचे आणि रु. 2710.93 कोटी खर्चाचे  सन 2018-19 चे सुधारित अंदाज, तसेच रु. 910.15 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु. 3455.64 कोटी जमा व रु. 3454.73 कोटी खर्चाचे आणि रु. 91.00 लक्ष शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2019-20 चे मूळ अंदाज मा. स्थायी समितीच्या समोर सादर करण्यात येत आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.

==========================================================================================================

 

मागील बातम्यांचाही मागोवा

  • स्पंदना – महिला लघुउद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ