- ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे, ५ फेब्रुवारी २०१९ :
महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी येत्या एका आठवड्यात श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश सोमवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. सदर श्वेतपत्रिका पुढील सोमवारपर्यंत सर्व अधिका-यांनी सादर करण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
गेल्या चार वर्षांच्या कालखंडामध्ये अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यातील अनेक प्रकल्प पुर्णत्वास गेले. अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत तर काही प्रकल्प मंजुर होवून अंमलबजावणीच्या स्तरावर आहेत. या सर्वांची विभागनिहाय माहिती संकलित व्हावी तसेच प्रत्येक विभागाने केलेल्या कार्याची वस्तुस्थिती माहित व्हावी तसेच विभागाची कार्यक्षमता तपासता यावी यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रत्येक विभागनिहाय श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले आहेत.
- या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून विविध विभागांना देण्यात आलेले उदिष्ट, करण्यात आलेली कार्यवाही याचा आढावा घेण्यात येणार आहे.
- यावेळी महापालिका आयुक्तांनी वसुलीचा आढावा घेताना प्रभाग समितीनिहाय जे मालमत्ता कराचे उदिष्ट देण्यात आले आहे ते पूर्ण करण्याच्यादृष्टीने कठोर परिश्रम घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर लेखा आक्षेप, स्थानिक लेखा आक्षेप तसेच महालेखाकार यांच्या कार्यालयाकडील प्रलंबित आक्षेप, राज्य शासनाकडील प्रलंबित संदर्भ, तारांकित अतारांकित प्रश्न आदीबाबत अधिका-यांनी विनाविलंब कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.
===================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- सानपाडा येथील रेल्वे मार्गालगतच्या संरक्षक भिंतीविरोधात रहिवाशी आक्रमक