अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, ५ फेब्रुवारी २०१९
सिडकोतर्फे सेक्टर- 36, खारघर, नवी मुंबई येथे साकारण्यात आलेल्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील 66 दुकाने व 10 किओक्सची नुकतीच (1 फेब्रुवारी 2019) रोजी विक्री करण्यात आली. यातून सिडकोला तब्बल ३६ कोटी ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे एका दुकानाला १ कोटीपेक्षा अधिक दर मिळाल्यामुळे अद्यापही सिडकोकडून मालमत्ता घेण्याकडे लोकांचा कल असल्याचे दिसून येते.
========================================================================================================
- सुवर्णमहोत्सवी छाया कला ब्रास बॅंडच्या कार्यक्रमात शंकर महादेवनचे बहारदार गाणे
======================================================================================================================
या योजने अंतर्गत एल व टी आकारातील दुकाने आणि किओस्क उपलब्ध करून देण्यात आली होते. 1 फेब्रुवारी रोजी हा अर्ज करण्याचा अंतिम दिनांक होता. याच दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत निविदा स्वीकारण्यात येऊन त्याच दिवशी दुपारी 2.30 वाजता निविदा उघडण्यात आल्या. या प्रक्रियेदरम्यान सिडकोने निश्चित केलेल्या आधारभूत किंमतीच्या कितीतरी अधिक दराने दुकानांची व किओस्कची विक्री झाली. 28.26 चौ.मी. क्षेत्रफळाच्या दुकानाला 1 कोटी 9 लाख 909 रुपयांची सर्वोच्च बोली लावण्यात आली होती. यातून सिडकोला अंदाजे 36 कोटी 80 लाख रुपये इतके विक्रमी उत्पन्न मिळाल्याची माहिती सिडकोतर्फे देण्यात आली आहे.
=====================================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
छाया कला सर्कल ब्रास बॅंड, दिवाळे गाव