रस्ता रुंदीकरणासाठी २०० बांधकामे तोडली

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

ठाणे, ८ जानेवारी २०१९:

 रस्ता रूंदीकरण मोहिमेतंर्गत ७ जानेवारी रोजी वागळे इस्टेटमध्ये सावरकर नगर ते ज्ञानेश्वरनगर या दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये जवळपास २००पेक्षा जास्त बाधित व्यावसायिक बांधकामे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थीतीत जमीनदोस्त करण्यात आली. यारस्त्यात बाधित होणारी जवळपास १२५ निवासी बांधकामे पुनर्वसनानंतर निष्काषित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त  जयस्वाल यांनी या कारवाईच्यावेळी दिले.

  • महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार रस्ता रूंदीकरणाची मोहिम महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार गेल्या शुक्रवारपासून सुरूकरण्यात आली असून शुक्रवारी वाघबीळ नाका ते वाघबीळ गाव या रस्त्यात बाधित होणारी जवळपास १२५ बांधकामे तोडून टाकण्यात आली होती.
  • आज वागळे इस्टेटमध्ये सावरकर नगर ते ज्ञानेश्वर नगर या रस्त्याच्या रूंदीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेतंर्गत मराठा हॉटेल सर्कल, कामगार हॉस्पीटल आणि परिसरातील जवळपास २०० पेक्षा जास्त व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
  • सद्यस्थितीत सावरकर नगर ते ज्ञानेश्वर नगर हा रस्ता २५ मीटरचा असून आता या कारवाईमुळे हा रस्ता ३० मीटरचा होणार आहे.

सदरची कारवाई उपायुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्ले, नगर अभियंता राजन खांडपेकर, उपनगर अभियंता अर्जून अहिरे, सहाय्यक आयुक्तमारूती गायकवाड, झुंजार परदेशी, सचिन बोरसे, कार्यकारी अभियंता नितीन येसुगडे, दिपक घाडगे, रामदास शिंदे, किशोर गोळे यांनी पोलीस बंदोबस्तात केली.

======================================================================================================================

मागील इतर बातम्यांचाही मागोवा

  • नवी मुंबईतील आगामी विविध प्रकल्पांविषयी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन.