नवी मुंबईत रंगणार राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई, 16 डिसेंबर 2018:

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हौशी व नवोदित बाल कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्याचबरोबर त्यांना राज्यातील विविध भागातील बालकलाकारांच अभिनय प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळावी याउद्दात्त हेतूने नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा 2018-19’ चे आयोजन करण्यात येत आहे. सदर स्पर्धेचे प्रवेश अर्ज 20 डिसेबर 2018 पर्यत विष्णूदास भावे नाट्यगृह येथे तसेच rahul.s.ingle31@gmail.com या इ-मेलवर सादर करावेत.

  •  नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत सर्व शाळा तसेच हौशी संस्था सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेची प्राथमिक फेरी 24 व 25 डिसेंबर 2018 रोजी होणार असून अंतिम फेरी विष्णूदास भावेनाट्यगृह, वाशी येथे दि. 02 जानेवारी 2018 रोजी संपन्न होणार आहे. नवी मुंबई महापौर चषक बालनाट्य स्पर्धा 2018 च्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या नाटकांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हासह अनुक्रमे रु.25,000/-, रु.20,000/-,रु.15,000/- अशा बक्षिस रक्कमा असून2 उत्तेजनार्थ नाटकांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हासह रु.5000/- इतकी रक्कमेची बक्षिसे आहेत.

 

  • नवी मुंबई महापौर चषक बालनाट्य स्पर्धा 2018 च्या नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील स्पर्धेकरीता प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हासह अनुक्रमे रु.15,000/-, रु.10,000/-,रु.5,000/- अशास्वरुपाची बक्षिसे आहेत.          सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्य प्रकाश योजना व संगीत या प्रत्येक गटाकरीता प्रथम, द्वितीय व तृतीय याकरीता प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हासह अनुक्रम रु.1000/-, रु.750/- व रु.500/- अशास्वरुपाची बक्षिसे आहेत.

नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा 2018-19 करीता जास्तीत जास्त शाळा तसेच नाट्य प्रशिक्षण संस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी केलेले आहे.

=======================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • सीबीडी सेक्टर ६ मधील ओपन जीम