अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे,16 नोव्हेंबर 2018:
नागरिकांना 31 मार्चच्या आधी मालमत्ता कर रक्कम भरणे सुलभ व्हावे यासाठी महापालिकेची कर वसुली कार्यालये 31 मार्च 2019 पर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येणार आहेत.
- सन 2018-2019 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर नागरिकांना वेळेत भरता यावी यासाठी महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालये व उप प्रभाग कार्यालये दिनांक १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यत दुसरा आणि चौथा शनिवार आणि इतर सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी (दिनांक २१ मार्च २०१९ वगळून) सकाळी 10.30 ते 5.00 या वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहेत.
- याशिवाय सर्व रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 (अर्धा दिवस) या वेळेत सुरु राहणार आहेत. तसेच नागरिकांना महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी सर्व मालमत्ताधारक नागरिकांनी आपला कर वेळेत भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
===================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- हॅंडलूम उत्पादनांना नवसंजीवनी