- सिडकोतर्फे आवाहन
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 16 नोव्हेंबर 2018:
सिडकोतर्फे “स्वप्नपूर्ती” व “मनपसंत” या गृहनिर्माण योजनांतर्गत प्रतिक्षा यादीवरील यशस्वी अर्जदारांना माहिती पुस्तिकेत नमूद केलेल्या अटी व शर्तींनुसार आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करण्याबाबत पत्र, ईमेल व एसएमएसद्वारे सूचित करण्यात आले होते. परंतु अद्यापि काही अर्जदारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली नाहीत. अशा अर्जदारांनी दिनांक 15 डिसेंबर 2018 पर्यंत सिडको महामंडळाच्या पणन व्यवस्थापक- 2, रायगड भवन, 3 रा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई या कार्यालयात (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) व्यक्तिशः उपस्थित राहून कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन संबंधित अर्जदारांना सिडकोतर्फे करण्यात येत आहे.
- प्रतिक्षा यादीवरील ज्या अर्जदारांना सर्व कागदपत्रे सादर करूनदेखील वाटपपत्र मिळाले नाही, अशा अर्जदारांनी विहित मुदतीत उपरोक्त कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. स्वप्नपूर्ती व मनपसंत गृहनिर्माण योजनेतील प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांसाठी देण्यात आलेली ही अंतिम मुदत आहे. नमूद कालावधीनंतर म्हणजेच दिनांक 15 डिसेंबर 2018 नंतर सदर योजनांकरिता कागदपत्रे सादर करण्याची किंवा कोणताही व्यवहार करण्याची मुदत संपुष्टात येईल व त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची कृपया संबंधित अर्जदारांनी नोंद घ्यावी.
=========================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- तालवाद्यांचा जादुगर -करण रामदास पाटील