राज्यात 2500 मेगावॉट क्षमतेचे सौर-औष्णिक संकरित प्रकल्प उभारणार

  • ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 16 नोव्हेंबर 2018:

सौर ऊर्जा  स्वस्त व शाश्वत असल्यामुळे येणाऱ्या काळात पारंपरिक ऊर्जेला चांगला पर्याय उपलब्ध होईल या दृष्टिने औष्णिक संचासोबत सोलर संचही लवकरच उभारले जातील. महानिर्मिती कंपनीकडील उपलब्ध असलेल्या जमिनींवर 2500 मेगावॉट क्षमतेचे सौर-औष्णिक संकरित प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

  • वीज निर्मिती केंद्रांना कोळश्याचा तुटवडा होऊ नये म्हणून दररोज 35 रैक कोळसा वीज निर्मिती केंद्राना पुरवला जाईल. महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रातून साडे सात हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.आगामी काळात  राज्यात लोडशेडींग होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश ऊर्जमंत्र्यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिले.

 

  • उन्हाळ्याच्या  काळात वीजेच्या वाढत्या मागणीमुळे वीजेची कमतरता निर्माण होते. परिणामी भारनियमनची परिस्थिती उद्भवते. हे भारनियमन टाळण्यासाठी आणि वीजेचे योग्य नियोजन करण्यासाठी ऊर्जामंत्री यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना औष्णिक विद्युत संचांची कार्यक्षमता वाढवून अधिक वीज निर्मिती करण्याचे आदेश दिले.

=============================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • स्पंदना- महिला लघुउद्योजकांसाठी हक्काचे व्यासपीट