- विजय साळे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई , 31 ऑक्टोबर 2018:
जुईनगर, सेक्टर २४ मधील चिंचोली तलावाजवळ नव्याने उभारण्यात आलेले सार्वजनिक शौचालय अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. शौचालयाशी निगडीत सर्व बांधकाम पूर्ण झालेले असताना आता उद्घाटनाचे सोपस्कार पूर्ण होण्याची वाट प्रशासन बघत आहे का, असा सवाल करीत हे शौचालय त्वरीत नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी नवी मुंबई महापालिकेच्या ब प्रभाग समितीचे सदस्य विजय साळे यांनी महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्याकडे केली आहे.
महापालिकेतर्फे उभारण्यात आलेले हे शौचालय आता अधिक काळ बंद न ठेवता २ ते ३ दिवसांत सुरू करावे. जेणेकरून नागरिकांना या शौचालयाचा लाभ घेता यावा, यासाठी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी विनंती विजय साळे यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
==================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- जुईनगर येथील शिवसह्याद्री सोसायटीला लीज डीड मिळाली