- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ जयंतराव पाटील यांचा राज्य सरकारला सवाल
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 22 ऑक्टोबर 2018
सरकारला 31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करायला कोणता मुहुर्त मिळणार आहे असा संतप्त सवाल करतानाच भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहे म्हणून दुष्काळ जाहीर करण्यात उशीर केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर केला. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 31 ऑक्टोबरनंतर राज्यात दुष्काळ जाहीर केला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी टिका केली आहे.
- गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून राज्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलने केली जात आहे. मात्र सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. 31 ऑक्टोबरला राज्यातील फडणवीस सरकारला 4 वर्षे पूर्ण होत आहे. हा मुहूर्त साधून तर राज्य सरकार दुष्काळ जाहीर करत नाही ना असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
- राज्यातील या भीषण दुष्काळी परिस्थितीला सरकारच जबाबदार असून सरकारच्या पाणी वाचवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार योजना, जलसंधारण योजना सर्वच फोल ठरल्या आहेत, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
लोकांना पिण्याचे पाणी कुठून पुरवायचे हा मोठा प्रश्न सरकार समोर आहे. सरकारचे हे अपयश आहे असेही जयंतराव पाटील म्हणाले. खरंतर मागच्या आठवड्यातच सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा होता, परंतु भाजप सरकार महाराष्ट्रातील जनतेला वेठीला धरत आहे. भाजप सरकारला लोकांची नाही तर फक्त निवडणुका जिंकायची चिंता आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
==============================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- विसाजी लोके यांच्या शिवप्रेरणा प्रबोधन ट्रस्टचा नवरात्रोत्व