अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 19 ऑक्टोबर 2018:
नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागाअंतर्गत कंत्राटी पध्दतीवर काम करणा-या कंत्राटी कामगार आणि अधिकारी योग्य पद्धतीने काम करतात की नाही, हे पाहण्यासाठी प्रशासनाने नवी शक्कल लढवली आहे. जीओ फेन्सिंग आणि ट्रॅकिंग प्रणाली असलेली मनगटी घड्याळे या कामगारांच्या मनगटांवर बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल ११ कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये मंजुरी आहे. आता सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
नवी मुंबई महापालिकेतील आरोग्य विभाग (मलेरिया विभाग, रूग्णालय, साफसफाई, पशुवैद्यकीय विभाग), घनकचरा व्यवस्थापन विभाग, उद्यान, शिक्षण, क्रीडा, मालमत्ता, विष्णुदास भावे नाट्यगृह, कार्यकारी अभियंता, स्मशानभूमी, सुरक्षा रक्षक या विभागांमध्ये सुमारे 5 हजार 700 कंत्राटी कामगार कामकार्यरत आहेत. या कामगारांच्या कामावर आणि त्यांच्या वेळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही प्रणाली राबविण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिका 8 हजार 700 यंत्र खरेदी करणार आहे. साडेतीन वर्षांसाठी तब्बल 11 कोटी 91 लाख 1 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे.
- या प्रस्तावानुसार महापालिकेतील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी 3 हजार तसेच 5 हजार 700 कंत्राटी सफाई कामगारांसाठी ही घड्याळे घेण्यात येणार आहे. प्रति कामगारासाठी प्रती महिना 315 या दराने 42 महिन्यांसाठी याबाबतचे कंत्राट आयटीआय कंपनीला देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली असून आता सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात येणार आहे.
==================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची वन टू वन मुलाखत