- भूमीपुत्रां समस्या सोडवण्यासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सक्रीय
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 16 ऑक्टोबर 2018:
सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भूमीपुत्र, सिडको वसाहतींमधील नागरिक, माथाडी कामगार, झोपडपट्टी अशा समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडण्यासाठी तसेच हे प्रश्न सोडवण्यासाठी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दशरथ सिताराम भगत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेचा शुभारंभ 18 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रा. एन.डी. पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याचेही भगत यांनी सांगितले.
- यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश नायडू, खजिनदार रामेश्वर शर्मा, सचिव देवेंद्र खाडे, सल्लागार निशांत भगत, जयसिंग सोनवणे, अनंत सिंग,संजय यादव, शैलेश घाग आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
- नवी मुंबईतील भूमीपुत्र रहिवासी, झोपडपट्टीमधील नागरीक, सिडको इमारतींमध्ये राहणारे रहिवासी, माथाडी कामगार, फेरीवाले, रिक्षा चालक मालक, व्यापारी वर्ग अशा सर्वच घटकांच्या हक्कांचे रक्षण करणे हे आपल्या संस्थेचे मुख्य ध्येय असल्याचे दशरथ भगत यांनी यावेळी सांगितले.
दशरथ भगत यांनी सांगितलेली संस्थेची ध्येय-
- भूमीपुत्रांचे पूर्ण पुनर्वसन
- मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाणातील जागेची मालकी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
- भूमीपुत्रांना त्यांच्या उपजिविकेचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे
- भूमीपुत्रांच्या गरजेपोटीच्या बांधकामांना संरक्षण मिळवून देणे.
- सिडको निर्मित धोकादायक इमारतींचा पुनर्विकास
- सिडको निर्मित इमारतींच्या जागेची मालकी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
- रखडलेले गृहसंकुल प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे.
- झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन
- झोपडीधारकांना नवीमुंबई हक्काचे घर मिळावे यासाठी जागेची मालकी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे
- स्वयंविकास हक्क किंवा अन्य पर्यायी विकास हक्क देणे.
- माथाडी कामगार, अल्प व मध्य उत्पन्न घटकांचे पुनर्वसन
- जागेची मालकी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे
- स्वयंविकास हक्क किंवा अन्य पर्यायी विकास हक्क देणे.
- सिडको निर्मित इमारतींच्या जागेची मालकी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
- बांधकाम नियमित करणे व बांधकामांना सुरक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
- सिडको घरकूल योजना आरक्षण
- शहरातील भूमीपुत्रांना आणि स्थानिकांना 100 टक्के आऱक्षणासाठी वेगळी घरकुल योजना राबविण्याकरिता किंवा घरकुल योनेत 50 टक्के आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणे.
- घरकुल योजनेत जमीन खर्च सोडून बांधकाम, विकास आणि प्रशासन खर्च यामध्ये ही सवलत मिळण्यासाठी प्रयत्न करणे.
- शहरातील भूमीपुत्र आणि स्थानिकांना शहर विकास योगदान म्हणून सर्व कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये सवलतीने उपचार देण्यात यावे, यासाठी प्रयत्न करणे
- भूमीपुत्र आणि स्थानिकांच्या मुलांना शैक्षणिक आरक्षण आण फीमध्ये सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न कऱणे.
- विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्वरीत रोजगार मिळण्यासाठी शैक्षणिक कोर्स आणि कामाचे कौशळ्य यांची योग्य सांगड घालून विद्यार्थ्यांना शिका, अनुभव घ्या आण रोजगार मिळवा अभियान सुरु करणार.
- नवी मुंबई परिसरातील दगडखाणी उद्योग पुन्हा सुरू करावा आणि दगड खदान उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या विविध 20 हजार लोकाना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
- नवी मुंबई शहरातील फेरीवाल्यांचे प्रलंबित प्रश्न आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणे.
- भूमीपुत्र आणि स्थानिकांना फेरीवाले धोरणात आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
- करदाते आणि योगदानकर्ते म्हणून भूमीपुत्रांना आणि स्थानिकांना महापालिका आणि सिडकोमधील नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
- रिक्षा टॅक्सी चालक मालकांना अधिकृत विसावा स्टॅंडचे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे.
- गॅरेज ही शहरातील नागरिकांची गरज आहे, म्हणून नोड निहाय नियोजनात्मक गॅरेजची जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे.
- भूमीपुत्र आणि स्थानिकांना कोरेटर्स आणि कॅटरर्सचे साहित्य ठेवण्यासाठी अडगळीतील जागा भाड्याने किंवा लीज स्वरुपात मिळण्यासाठी प्रयत्न करणे.
- काही पोलीस ठाणी आणि पोलीस चौक्यांच्या जागा आरक्षित करणे आणि इतर सुविधा राज्य शासन, सिडको,महापालिका यांच्या माध्यमातून पुरविण्याबाबत प्रयत्न करणे.
संस्थेची उद्दिष्टे
- नवी मुंबईतील बाधित घटकांच्या पुनर्वसनासाठी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी निरनिराळे शैक्षणिक उपक्रम राबविणे.
- सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करुन गायन, नृत्यकला आदी कलागुणांची जोपासना करणे आणि सर्व आदरणीय राष्ट्रपुरुषांचे स्मृतिदिन साजरे करणे आणि त्यांच्या विचारांचा प्रचार करणे.
- परिसरातील क्रीडा क्षेत्रातील मुलांसाठी क्रिडांगण उपलब्ध करुन विविध क्रीडास्पर्धा आयोजित करणे.
- शिक्षणक्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तके, गणवेश यांचे वाटप करणे, हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार करणे आणि त्यांच्यातील अंगभूत कलागुणांना वाव देणे.
- परिसरात वाचनालय, ग्रंथालय अभ्यासिका स्थापन करणे
- महिलांच्या विकासाच्यादृष्टीने शासन प्रणित योजनांचे मार्गदर्शन, सुविधा उपलब्ध करून देणे तसेच महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करणे.
- परिसरातील लोकांकरिता वैद्यकीय शासनप्रणित योजनांचे मार्गदर्शन, सुविधा उपलब्ध करून देणे तसेच महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करणे.
- परिसरातील लोकांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, रक्तदारन शिबीर, आरोग्य चिकित्सा शिबीर, नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित कऱणे.
- वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वसतीगृह, आश्रमशाळा, मुकबधीर, अपंग शाळा आदींना मदत करणे.
- कलाकार, नाटककार, साहित्यिक लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी संगीत नृत्य, त्यांच्या स्पर्धा भरविणे, उत्कृष्ठ कलाकार निर्माण करणे.
- वृक्षारोपण, पर्यावरण आदी योजनांसंदर्भात लोकप्रशिक्षण देणए, सामाजिक बांधिलकी म्हणून नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना योग्य ती मदत करणे.
- समाजातील अंधश्रद्धा, रुढीप्रियता नष्ट करण्यासाठी परिसंवाद घडवून आणणे. त्यातूनच परिवर्तन करून व्यसनमुक्तीसाठी शिबीर आयोजन करणे.
=================================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- दशरथ भगत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सक्रीय
==================================================================================================================
दशरथ भगत दसऱ्यापासून नव्या भूमिकेत
https://goo.gl/vqGtCK