- नागरिकांमध्ये जावून समस्या सोडविण्यावर भर
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई,9 ऑक्टोबर 2018:
विविध विभागांतील स्वच्छताविषयक तसेच नागरी सुविधा कामांची पाहणी करतानाच स्थानिक नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांच्या सूचना, अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. विविध विभागांना भेट देण्याचा उपक्रम राबवित आहेत. त्यानुसार बेलापूर विभागातील यशस्वी दौ-यापाठोपाठ आता 10 ऑक्टोबर रोजी ऐरोली विभागाला ते भेट देणार आहेत.
- सकाळी 10 ते 11 या वेळेत ऐरोली विभाग कार्यालयात नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार
- जे नागरिक आयुक्तांना भेटून आपल्या अडी-अडचणी, सूचना, संकल्पना मांडू इच्छितात त्यांनी सकाळी 9.30 ते 10 या वेळेत विभाग कार्यालयात उपस्थित राहून टोकन क्रमांक घ्यावयाचा आहे.
- नागरिकांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात दोन प्रतीत सादर करावयाचे आहे.
- नागरिकांच्या सादर केलेल्या प्रश्नांवर आयुक्त विभागप्रमुख व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चात्मक बैठक घेऊन ऐरोली विभागात पाहणी दौरा करणार आहेत.
11 ऑक्टोबर रोजी होणारा पूर्वनियोजित तुर्भे विभागातील पाहणी दौरा त्यादिवशी ‘ड’ प्रभाग (तुर्भे) समितीची सभा जाहीर झाली आहे. त्यामुळे तुर्भे विभागातील आयुक्तांच्या दौ-याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल
घणसोली विभागातील पाहणी दौरा 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
=============================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- बेलापूरमध्ये नागरिकांनी थेट महापालिका आयुक्तांकडेच गाऱ्हाणी मांडली