किमान वेतन फरकाच्या धनादेश सफाई कामगारांना सुपूर्द

अविरत वाटचाल

नवी मुंबई, 28 सप्टेंबर 2018:

स्वच्छ भारत अभियानामध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशातील सर्व प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहराला दररोज नियमितपणे स्वच्छ ठेवणा-या सफाई कामगारांचा प्रमुख वाटा आहे. नवी मुंबईच्या स्वच्छतेचे शिल्पकार असणाऱ्या या सफाई कामगारांना अखेर किमान वेतन फरकाच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. महासभेने किमान वेतन मिळावे असा ठराव मंजूर केल्यानंतर महापौर जयवंत सुतार यांच्याहस्ते या धनादेशांचे वितरण करण्यात आले.

  • जुलै, 2018 महिन्याच्या महासभेत कंत्राटी स्वरुपात काम करणा-या सफाई कामगारांना पहिल्या टप्प्यात मे, 2016 ते मे, 2017 या कालावधीतील किमान वेतनाचा फरक मिळण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला आहे.

 

  • या निर्णयाची अंमलबजावणी कंत्राटी कामगारांना प्रातिनिधीक स्वरुपात महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते किमान वेतनाच्या फरकाचा धनादेश प्रदान करुन करण्यात आली.

 

  • यावेळी सभागृह नेते रविंद्र इथापे, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष प्रतोद डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका  शुभांगी पाटील व नगरसेविका शशिकला पाटील हे उपस्थित होते.

===============================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • पामबीच रोडवर गाड्यांचा वेग मंदावला