जुईनगर स्टेशनजवळील पायवाट झाली मोकळी

  • वाढलेली झाडे,झुडपे छाटून पादचारी रस्ता मोकळा
  • नागरिकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विजय साळे यांचे आभार

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 12 सप्टेंबर 2018:

जुईनगर स्टेशनकडे जाणाऱ्या पायवाटेलगत पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि झुडपांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि नवी मुंबई महापालिकेच्या  ब प्रभाग समितीचे सदस्य विजय साळे  पुढाकार घेत यांनी रस्त्याच्या दुतर्फा बेसुमार वाढलेली  झुडुपांची योग्य पद्धतीने छाटणी करून रस्ता मोकळा केला. 

 

  • जुईनगर नागरी वस्तीकडून  रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या पायवाटेलगत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडे आणि झुडपांमुळे रहिवाशांना त्रास होत होता. रात्रीच्यावेळी वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे दिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पडत नव्हता. शिवाय गर्द झाडीमुळे भुरट्या चोरांची भिती निर्माण झाली होती. त्यामुळे या मार्गालगत (पायवाट)ची वाढलेली बेसुमार झाडांच्या फांद्या आणि झुडपांची योग्य ती छाटणी व्हावी,  अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. यासंदर्भात नागरिकांनी शनिवारी साळे यांना भेटून गाऱ्हाणे मांडले.

 

  • नागरिकांची गैरसोय लक्षात घेताच साळे यांनी तातडीने महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून  झाडांच्या वाढलेल्या फांद्या आणि रस्त्यालगत वाढलेली झुडुपे काढून टाकण्याचे काम मंगळवारी करून घेतले.  साळे यांनी  रस्त्यालगतची  वाढलेली झुडपे काढण्याचे काम तातडीने करून  घेतल्यामुळे नागरिकांनी  समाधान व्यक्त केले.

दरम्यान, जुईनगर परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने लक्ष घालणार असून नागरिकांनी परिसरातील समस्या जरूर कळवाव्यात. त्या समस्या दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, असे विजय साळे यांनी सांगितले. 

=======================================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • जुईनगर येथील शिवसह्याद्री गृहनिर्माण सोसायटीच्या लीज डीडचा प्रश्न