- सर्वसाधारण सभेत कोट्यवधी रूपयांचे प्रस्ताव चर्चेविना दीड तासांत मंजूर
- बोलू न दिल्यामुळे सभागृह नेते रविंद्र इथापेही नाराज
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 11 सप्टेंबर 2018:
नवी मुंबई महापालिकेची सप्टेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा अवघ्या दीड तासांमध्ये संपली. विषय पत्रिकेवरील कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना तातडीने मंजूर करण्यात आले. सभागृहासमोर चर्चेसाठी आलेल्या विषयांवर आपल्याला बोलू न दिल्यामुळे सभागृह रविंद्र इथापेंसह अनेक नगरसेवकांनी महापौरांविरोधात नाराजीचा सूर आळवला. आज सत्ताधारीच एकमेकांसमोर उभे टाकले गेल्याचे चित्र दिसून आलं. तर विषयांवर बोलू न दिल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक बहादुर बिष्ट यांनी महापौरांसमोरच्या मोकळ्या जागेत येत विषयपत्रिका भिरकावल्या.
- महापालिकेच्या मंगळवारच्या मंगळवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्वाचे प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये कोपरखैरणे प्रभार क्रमांक 55 खैरणेगाव येथे अंगणवाडीच्या जागेवर बहुउद्देशीय इमारत बांधणे, वाशी रूग्णालयाच्या आवारात जेनेरिक औषध विक्री केंद्र सुरू करणे, नेरूळ सेक्टर 19 येथील यशवंतराव चव्हाण क्रिडांगणाची सुधारण करणे, केरळ पूरग्रस्तांसाठी 25 लाखांचा निधी देणे, सीबीडी सर्कल तोडून रस्ता तयार करणे यांसारख्या असंख्य महत्वाच्या कामांचा समावेश होता. मात्र या पैकी एकाही प्रस्तावार सविस्तर चर्चा झाली नाही. कोणत्याही चर्चेविना प्रस्ताव मंजूर केल्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केलीच. शिवाय सत्ताधारी पक्षाचे वरीष्ठ नगरसेवक आणि सभागृहनेते रवींद्र इथापे यांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली.
- महासभेत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची वार्षिक देखभाल दुरूस्ती करण्यासाठी त्रेचाळिस कोटी ऐंशा लाख चौ-याहत्तर हजार आठशे एकोणसत्तर रूपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक बहादुर बिस्ट यांनी बोलण्यासाठी महापौरांकडे परवानगी मागितली. मात्र महापौरांनी बोलू दिले नाही. संतप्त झालेल्या बिस्ट यांनी महापौरांच्या समोरच्या जागेत येत विषयपत्रिका हवेत भिरकावल्या. त्यानंतर सभात्यागही केला.
शहरातील विविध विकासकामांचे प्रस्ताव लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मंजूर करावेत असा नियम आहे. मात्र मंगळवारी झालेल्या सर्वसाधारणसभेत अनेक विषयांवर सदस्यांची बोलण्याची इच्छा होती. मात्र महापौर जयवंत सुतार यांनी बोलू न दिले नाही, अशी नाराजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी व्यक्त केली.
======================================================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- करावे येथील गणपतशेठ तांडेल मैदानाचे भूमिपूजन