निवडणुकांसाठी राज्यात महाआघाडी

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निर्णय

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई ,11 सप्टेंबर 2018:

आगामी निवडणुकांसाठी राज्यात समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्यात येणार असल्याचे सुतोवाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज मुंबईत केले. आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीमध्ये समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करण्याबाबत सहमती झाली असून लवकरच इतर पक्षांशी याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीनंतर चव्हाण यांनी पत्रकारांना दिली.

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, सुनिल तटकरे, विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, माजी मंत्री नसीम खान, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

 

====================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • सिडको इमारतींच्या प्रश्नांबाबत गणेश नाईक काय म्हणाले ?