मातृत्वाच्या संदेशासाठी ‘मदर्स ऑन व्हिल्स’

चार माता ६० दिवसांमध्ये करणार २२ देशांचा प्रवास

 अविरत वाटचाल न्यूज

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2018:

मुलांच्या व्यक्तीमत्व विकासात मातेचे योगदान आणि मातृत्वाचे महत्व या विषयांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी चार माता ६० दिवसांमध्ये २२ देशांचा प्रवास करून इंग्लड येथे पोहचणार आहेत.  त्यांच्या  ‘मदर्स ऑन व्हिल्स’ या प्रवासाला आज परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी  झेंडा दाखवला.

नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात स्वराज यांनी कोल्हापूर येथील ‘फाऊंडेशन फॅार होलिस्टीक डेव्हलपमेंट इन अकादमीक फिल्ड’ या संस्थेच्या ‘मदर्स ऑन व्हिल्स’ उपक्रमात सहभागी चार महिलांची भेट घेतली  व त्यांच्या योजनेबाबत माहिती जाणून घेतली . पुणे येथील शितल वैद्य-देशपांडे आणि ऊर्मिला जोशी, ग्वाल्हेरच्या माधवी सिंग व दिल्लीच्या माधुरी सहस्त्रबुध्दे यांनी धाडस दाखवून या उपक्रमात घेतलेल्या सहभागाबद्दल श्रीमती स्वराज यांनी कौतुक केले व उपक्रम व प्रवासाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.

या महिलांनी आजपासून दिल्लीतून कारद्वारे प्रवासास सुरुवात केली आहे. लाल रंगाच्या या विशेष गाडीवर मातृत्वाचे विविध संदेश लिहीण्यात आले आहेत. २० हजार किलो मिटर पेक्षा जास्त अंतराचा हा प्रवास असणार आहे.

 

=========================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा 

  • 91 वर्षाच्या आजीबाई नव्या पिढीला सांगतात, माणसं जपा