अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 25 ऑगस्ट 2018:
26 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण असल्याने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातर्फे सकाळी 10.30 ते रात्री 21.30 या काळात नेहमीच्या बसेसव्यतिरिक्त 40 ते 50 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
या बसेस आवश्यकतेनुसार विविध बस मार्गांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याकरीता उपक्रमाच्या तिन्ही बस आगारातून पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा लाभ प्रवाशी जनतेने घेण्याचे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करण्यात येत आहे.
=========================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- नेरुळ- खारकोपर रेल्वमार्ग ऑक्टोबरपासून सुरु