नेरूळमध्ये घराचे प्लास्टर कोसळले, 2 जखमी

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 16 ऑगस्ट 2018:

सिडकोतर्फे बांधण्यात आलेल्या निकृष्ठ इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून आज पहाटे नेरुळ सेक्टर 48 मधील साईसंगम सोसायटीत एका घराचे प्लास्टर कोसळले. या दुर्घटनेत दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत.

नेरुळ सेक्टर 48 मधील साईसंगम सोसायटीत सुषांत विजय नारकर  हे इमारत क्रमांक 42 मधील खोली क्रमांक 6 मध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास सुषांत नारकर यांच्या आई आणि एक मुलगी हॉलमध्ये झोपलेल्या असताना त्यांच्या अंगावर छताचे संपूर्ण प्लॅस्टर कोसळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


  • दरम्यान, नवी मुंबई शहरात सिडकोने उभारलेल्या  इमारतींमधील अनेक घरांच्या छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना वरचेवर घडू लागल्या आहेत. तसेच इमारतींच्या बांधकामांनाही तडे गेल्याचे समोर येत आहे.  या निकृष्ठ इमारतींच्या पुर्नबांधणीच्या कामाला तातडीने सुरुवात करावी आणि हजारो कुटुंबांच्या जिविताला असणारा धोका दूर करावा, अशी मागणी नागरिक सातत्याने करू लागले आहेत.

==========================================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • स्पंदना -महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ