नवी मुंबई महापौर चषक एकपात्री अभिनय स्पर्धा

अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 13 ऑगस्ट 2018:

आचार्य अत्रे यांचे जयंती निमित्ताने अखिल भारतीय नाट्य परिषद, ऐरोली शाखा यांच्या सहयोगाने नवी मुंबई शहरात प्रथमच “नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा” आयोजित करण्यात येत आहे. नवी मुंबई शहरामध्ये सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी व नवोदित कलाकारांना त्यांचे कलागुण सादर करणेकरीता व्यासपीठ मिळावे हा या स्पर्धेमागचा प्रमुख हेतू आहे.

  • या स्पर्धेची प्राथमिक फेरी 19 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 28, सेक्टर 15/16, मॉडर्न कॉलेजच्या बाजूला, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी सुरु होणार आहे. याकरीता प्रथम नोंदणी करणे आवश्यक राहील. स्पर्धेची अंतिम फेरी 20 ऑगस्ट 2018 रोजी विष्णूदास भावे नाट्यगृह येथे होणार आहे.

 

दोन गट

  1. किशोरगट वय वर्षे 10 ते 16
  2. खुलागट वय वर्षे 17 पासून पुढे

 

स्पर्धा प्रवेश अर्ज व सविस्तर माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच Akhil Bhartiya Marathi Natya Parishad Airoli या fecebook page वर उपलब्ध आहे.
दोन्ही गटात यशस्वी प्रत्येकी 5 स्पर्धकांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

 

===============================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • स्पंदना- महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ