अविरत वाटचाल न्यूज
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2018:
संपूर्ण जगात भारतीय सैन्याचा दरारा आहे . भारतीय लष्कराच्या ताकदीमुळे कोणीही आपल्या वाट्याला जाण्याची हिंमत करीत नाही. मात्र अशा या बलशाली सैन्याला आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची काहीशी कमतरता भासू लागली आहे. संरक्षण दलाच्या तिन्ही म्हणजे भूदल, नौदल आणि हवाई दलामध्ये सुमारे 9 हजार 96 अधिकाऱ्यांची कमी जाणवत असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी बुधवारी लोकसभेत दिली.
सशस्त्र दलांमध्ये पदभरती ही निरंतर प्रक्रिया आहे. अधिकाऱ्यांची कमतरता भरुन काढण्यासाठी तसेच युवा वर्गाला सशस्त्र दलांकडे आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत, असेही संरक्षण राज्यमंत्र्यांनी सांगितले.
भारतीय सैन्यदलातील अधिकाऱ्यांची कमतरता
====================================================================================================================
- स्पंदना- महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ