गणपतीसाठी कोकण रेल्वेमार्गावर 4 आणखी गाड्या

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 30 जुलै 2018:

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेवून मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर आणखी 4 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेतर्फे कोकण रेल्वे मार्गावर गणपतीविशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आता नव्याने सीएसएमटी-सावंतवाडी आणि पुणे- झारापदरम्यान या 4 गणपती विशेष गाड्या धावणार आहेत.

सीएसएमटी-सावंतवाडी विशेष (2)

  1. गाडी क्रमांक 01013 ही 13 सप्टेंबर 2018 रोजी रात्री 9.20 ला सीएसएमटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01014 ही 14 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सावंतवारीड रोड येथून सुटेल आणि रात्री 11 वाजता सीएसएमटी स्थानकात पोहोचेल.
  • गाड्यांचे थांबे

दादर (केवळ 01014 साठी), ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

  • डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना 1 फर्स्ट क्लास कम सेकंड क्लास एसी , 2 थ्री टायर एसी, 4 स्लीपर आणि 5 सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

पुणे-झाराप विशेष (2)

  1. 01421 विशेष गाडी 10 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 ला पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2.15 ला झारापला पोहोचेल.
  2. 01422 विशेष गाडी 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 3.30 ला झाराप स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता पुण्याला पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशेष गाड्यांना चिचंवड, लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे , राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

  • डब्यांची रचना

1 टु टायर एसी, 3 थ्री टायर एसी, 6 स्लीपर आणि 6 सेकंड क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

 

  • रिझर्व्हेशन

या चारही विशेष गाड्यांचे तिकिट रिझर्व्हेशन 2 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर सेकंड क्लासचे डबे अनारक्षित असणार आहेत.

 

गणपती विशेष गाड्यांना अतिरिक्त डबे जोडणार

  • गाडी क्रमांक 010239/01040 लोकमान्य टिळक टर्मिनस या विशेष गाडीला 2 अतिरिक्त स्लीपरचे डबे जोडणार

टू टायर एसी आणि थ्री टायर एसीचे अतिरिक्त डबे खालील गाड्यांना जोडणार

  1. गाडी क्रमांक -01431/ 01432 पुणे-सावंतवाडी रोड-पुणे विशेष
  2. गाडी क्रमांक -01433/ 01434 पनवेल-सावंतवाडी रोड- पनवेल विशेष
  3. गाडी क्रमांक -01435/ 01436 पनवेल-सावंतवाडी रोड- पनवेल विशेष
  4. गाडी क्रमांक -01447/ 01448 पनवेल-सावंतवाडी रोड- पनवेल विशेष
  5. गाडी क्रमांक -01449/ 01450 पनवेल-रत्नागिरी- पनवेल विशेष

================================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • गणेशोत्सवासाठी कोकणात पश्चिम रेल्वेतर्फे गाड्या
    https://goo.gl/ct7xUJ

 

  • गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 132 विशेष गाड्या
    https://goo.gl/sJHTGd
  • गणपती स्पेशल राजापूर, वैभवाडीला थांबणार
    https://goo.gl/qt6k3d
  • तालवाद्यांचा जादुगर -करण रामदास पाटील