अविरत वाटचाल न्यूज
नवी दिल्ली, 31 जुलै 2018:
इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची 31 जुलैची मुदत आता वाढविण्यात आली आहे. नागरिकांना आपले रिटर्न भरण्यास पुरेसा अवधी मिळावा यासाठी अर्थ मंत्रालयाने ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवून दिली आहे.
रिटर्न भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर उशिरा रिटर्न भरणाऱ्यांना दंड सोसावा लागणार होता. त्यामुळे 31 जुलैच्या आत आपली रिटर्न भरण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली होती. मात्र नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून 31 जुलैची मुदत वाढून ती आता 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने ट्वीट केले आहे.
Upon consideration of the matter, the Central Board of Direct Taxes (CBDT) extends the ‘Due Date’ for filing of Income Tax Returns from 31st July, 2018 to 31st August, 2018 in respect of the said categories of taxpayers.
— Ministry of Finance (@FinMinIndia) July 26, 2018
===========================================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- स्पंदना -महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ