मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक (22 जुलै)

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 21 जुलै 2018:

रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेतर्फे मेन आणि हार्बर मार्गावर रविवारी (22 जुलै) मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे दोन्ही मार्गांवरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मुलुंड-माटुंगा अप फास्ट मार्गावर सकाळी 10.15 ते दुपारी 3.15

  • सकाळी 9.38 ते दुपारी 2.54 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या फास्ट आणि सेमी फास्ट गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकाच्या दरम्यान डाउन स्लो मार्गावर चालविण्यात येतील . तसेच या गाड्या या दोन स्थानकांच्या दरम्यान सर्व स्थानकांवर थांबवण्यात येतील. या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 10.46 ते दुपारी 3.19 या काळात ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व अप फास्ट आणि सेमी फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 1 ते सायंकाळी 5 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व स्लो मार्गावरील गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.
  • मेगाब्लॉकच्या काळात सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या तसेच येणाऱ्या स्लो मार्गावरील सर्व गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील .

मेगाब्लॉकच्या काळात सीएसएमटी, दादरवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या माटुंबा आणि मुलुंड स्थानकांच्या दरम्यान स्लो मार्गावरून चालविण्यात येतील. या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 30 मिनिटे उशिराने सोडण्यात येतील.

 

सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत तसेच चुनाभट्टी,वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या काळात

  • सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 या काळात सीएसएमटी, वडाळा रोड वरून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या सर्व डाउन गाड्या तसेच सकाळी 9.56 ते 4.43 या काळात सीएसएमटीहन वांद्रे, अंधेरी, गोरेगावसाठी सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या काळात पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीला जाणाऱ्या तसेच सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 या काळात अंधेरी, वांद्रे, गोरेगावहून सीएसएमटीला सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

या मेगाब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावर पनवेल-कुर्ला दरम्यान फलाट क्रमांक 8 वरून विशेष गाड्या चालविण्यात येतील.

 

मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या काळात पश्चिम रेल्वे तसेच मेन लाइनवरून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

========================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • गणपती स्पेशल राजापूर, वैभवाडीला थांबणार
    https://goo.gl/qt6k3d

 

  •  स्पंदना -महिला लघुुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ