अविरत वाटचाल न्यूज
ठाणे,18 जुलै 2018:
ठाणे महापालिकेतर्फे शहरात सार्वजनिक वाय-फाय सुविधेतंर्गत सुरू करण्यात आलेली वाणिज्य वापर सुविधा आज सुरु करण्यात आली.
डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत नागरिकांना आता शहरात फ्री वायफाय सेवेचा लाभ घेता येणार आहे . शहरातील सर्व रस्ते वायफायशी जोडले असून पुढील 10 वर्षे ही सेवा शहरात कार्यरत असणार आहे . शहरात कोणत्याही ठिकाणी ठाणे सिटी फ्री वाय फाय या नावाने सुरू केलेले वाय फाय वापरता येणार आहे .
- नागरिकांना आपल्या मोबाइलमध्ये लॉगीन करून या सेवेचा लाभ घेता येणार आहे .
- या सेवेमध्ये 800Kbps स्पीडने अमर्यादीत फ्री वाय फाय वापरता येणार आहे.
- ज्या नागरिकांना 800 kbps स्पीड पेक्षाही जास्त स्पीड ने wifi ची सेवा हवी आहे त्यांना अधिक मूल्य देवून माफक दारात 50 mbps स्पीडने ही सेवा वापरता येणार आहे.
- या वायफाय सेवेमध्ये 10 रुपये पासून ते 400 रुपये पर्यत प्लॅन देण्यात आले आहेत.
- 10 रुपयेमध्ये 2 जीबी डाटा 1 दिवस
- 30 रुपयेमध्ये 5 जीबी 2 दिवस
- 50 रुपयेमध्ये 20 जीबी 7 दिवस
- 100 रुपयेमध्ये 45 जीबी 14 दिवस
- 150 रुपयेमध्ये 100 जीबी 28 दिवस
- 200 रुपयेमध्ये 150 जीबी 28 दिवस
- 300 रुपयेमध्ये 250 जीबी 28दिवस
- 400 रुपयेमध्ये 400 जीबी 56 दिवसाकरिता ही सेवा वापरता येणार आहे .
============================================================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
घोट नदीत कार कोसळल्यानंतरचा थरार