- राज्य सरकारची विधान परिषदेत घोषणा
- १ ऑगस्टपासुन खाद्यपदार्थांच्या किंमतीची एकच एमआरपी
अविरत वाटचाल न्यूज
नागपूर, 13 जुलै 2018:
राज्यातील विविध महानगरांमधील मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेवून जाण्यास कुठलीही बंदी नाही.अशी बंदी कोणी करत असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत दिली.
- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर राज्य सरकारतर्फे ही माहिती देण्यात आली. या कारवाईसंबंधी गृह विभाग सहा आठवडयांच्या आत धोरण ठरविणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
- मुंडे यांनी आज उपस्थित केलेल्या लक्षवेधीत मल्टीप्लेक्स, महामार्गावरील फुडमॉल व मॉलमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास घालण्यात येणारी बंदी आणि आतील खाद्यपदार्थांची जादा दराने होणारी विक्री याकडे सरकारचे लक्ष वेधले होते.
1 ऑगस्टपासून सर्वत्र एमआरपी
पाण्याची बॉटल असेल किंवा अन्य खाद्यपदार्थ यांचे दर मल्टीप्लेक्स, मॉलमध्ये वेगळे आणि बाहेर वेगळे का? असा प्रश्न मुंडे यांनी केला. त्यावर केंद्रसरकारने केलेल्या कायद्याप्रमाणे १ ऑगस्टपासुन एकाच वस्तुची वेगवेगळी एमआरपी राहणार नसल्याचे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
============================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- स्पंदना ःमहिला लघुुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ