नवी मुंबईतील 405 अनधिकृत धार्मिक स्थळांवर लवकरच कारवाई

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 12 जुलै 2018:

नवी मुंबई परिसरातील विविध प्राधिकरणनिहाय असणाऱ्या सुमारे 405 अनधिकृत धार्मिक स्थळांवर उच्च न्यायालयाने पारित केलेल्या निर्देशानुसार कृती आराखडा तयार करून कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिका स्तरीय समितीचे अध्यक्ष तथा नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही काळांपासून अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधातील थांबलेल्या कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.

  • अनधिकृत धार्मिक स्थळांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत महानगरपालिका स्तरीय समितीचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकामाबाबत विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत प्राधिकरणनिहाय अनधिकृत धार्मिक स्थळांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये निष्कासन कार्यवाही करणे शिल्लक राहिलेल्या धार्मिक स्थळांपैकी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 12,  सिडको क्षेत्रातील 330, एम.आय.डी.सी. क्षेत्रातील 55, वन विभाग क्षेत्रातील 7, वन विभाग (कांदळवन कक्ष) क्षेत्रातील 01 अशा सर्व क्षेत्रातील धार्मिक स्थळांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन मा. उच्च न्यायालयाने पारित केलेल्या निर्देशानुसार कृती आराखडा तयार करुन कारवाई करण्याचे महानगरपालिका स्तरीय समितीचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सर्व प्राधिकरणास सूचित केले.  

===========================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • स्पंदना- महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ