खेडच्या जगबुडी नदीला पूर, पुलावरील अवजड वाहतूक बंद

  • मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतुक मंदावली

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 5 जुलै 2018:

कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून खेड तालुक्यातील जगबुडी नदीला पूर आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जगबुडी पुलावरील अवजड वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

  • कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असून नद्यांना पूर आला आहे. खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीही ओसंडून वाहत आहे. येथील पाण्याची पातळी 8 मीटरपर्यंत वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील वाहतूक संध्याकाळी 5 च्या सुमारास काही काळासाठी थांबविण्यात आली आहे. सध्या पाण्याचा जोर वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहने थांबविण्यात आली असून लहान वाहनांची वाहतूक जगबुडी नदीच्या पुलावरून सुरू असल्याची माहिती कोकण भवनमधील कोकण परिक्षेत्र पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

  • नदी क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी झाली की, त्वरीत अवजड वाहनांचीही वाहतूक सुरू होईल.त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

 

===========================================================================================================

 

इतर बातम्यांचाही मागोवा…

  • न्हावा शेवा- शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड