नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शेळया-मेंढया निर्यात

प्रातिनिधिक फोटो

अविरत वाटचाल न्यूज

नवी दिल्ली,  25  जून 2018 :

नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून  येत्या 30 जूनला पहिल्यांदाच 2000 शेळया-मेंढया आखाती देशांमध्ये निर्यात होणार असल्याची माहिती खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. येथील उद्योग भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली.

  • विदर्भातील आत्महत्याग्रस्त  भागातील  शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतक-यांच्या शेळया-मेंढयांचे निर्यात करण्याचे पाऊल शासनाव्दारे उचलले जात आहे.
  • पहिल्या टप्प्यात 30 जूनला 2000 जीवंत शेळया-मेंढया आखाती देशात निर्यात केल्या जातील.
  • निर्यात होणा-या शेळया-मेंढयांची वैद्यकीय तसेच संबधित तपासणी केली जात आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या खेपेच्या शेळया-मेंढया निर्यात केल्या जातील.
  • केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय कृषी मंत्रालय, मिहान, एअर इंडिया यांच्या संयुक्त सहयोगातून ही योजना आखली गेली, असल्याचे  महात्मे माहिती यांनी दिली.
  • या नवीन उपक्रमाव्दारे मेंढपाळ, शेळी पालन करणा-या  शेतक-यांना रोजगाराच्या तसेच आर्थिक उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.  पशुधन हे शेतक-यांसाठी ‘एटीएम’ सारखे असते. पशुधनापासून शेतक-यांना आर्थिक लाभ मिळतो, असे ते म्हणाले.
  • भविष्यात शेळया-मेंढया निर्यातीसाठी तत्सम सहकारी संस्था निर्माण करण्यात येण्याचा मानस असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.

===============================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • स्पंदना- महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ