अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 25 जून 2018:
पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांना नवी मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तब्बल 2 हजार 180 किलो इतक्या मोठ्या प्रमाणात प्रास्टिक महापालिकेकडे जमा झाले असून ते तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी नेऊन त्यापासून बनविण्यात येणा-या प्लास्टिक ग्रॅन्युल्सचा उपयोग डांबरी रस्ते निर्मितीच्या वेळी कोटींगसाठी केला जाणार आहे. दरम्यान, प्लास्टिक व थर्माकोलमुक्त नवी मुंबईच्या संकल्पपूर्तीसाठी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक, थर्माकोल नियंत्रक पथके स्थापन करून अंमलबजावणीही सुरू केली आहे.
नवी मुंबईत प्लास्टिक संकलन केंद्रे
- नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व आठही विभाग कार्यालयात प्लास्टिक संकलन केंद्रे स्थापन करण्यात आली . याशिवाय आपल्या सोसायटी, वसाहतीमध्ये एकत्रितपणे प्लास्टिक, थर्माकोल जमा केल्यास नजिकच्या विभाग कार्यालयास त्याची कल्पना दिल्यास त्याची वाहतुक व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल. याकरिता व्हॉटस् ॲप क्रमांक 9769894944 अथवा 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- बेलापूर विभाग कार्यालय – 200 किलो, नेरूळ विभाग कार्यालय – 500 किलो, वाशी विभाग कार्यालय – 400 किलो, तुर्भे विभाग कार्यालय – 150 किलो, कोपरखैरणे विभाग कार्यालय – 200 किलो, घणसोली विभाग कार्यालय – 150 किलो, ऐरोली विभाग कार्यालय – 500 किलो, दिघा विभाग कार्यालय – 80 किलो याप्रमाणे साधारणत: 2180 किलो प्लास्टिक जमा झाले आहे.
15 लाखांचा दंड वसूल
- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 4 जूनलाच मोठ्या प्रमाणावर धडक मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये महानगरपालिकेच्या आठ विभाग कार्यालय क्षेत्रात साधारणत: 9 टन इतक्या मोठया प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच 15 लक्ष इतकी मोठ्या स्वरूपात दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
प्लास्टिक वापरल्यास काय शिक्षा
- पहिल्या गुन्ह्यास रू. 5 हजार
- दुस-या गुन्ह्यास रू. 10 हजार
- तिस-या गुन्ह्यास रू. 25 हजार दंड + 3 महिने कारावास
========================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- हे प्लास्टिक वापरण्यास परवानगी
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उलवे टेकडीचे सपाटीकरण