मध्य रेल्वेच्या 24 जूनच्या वेळापत्रकात बदल

  • दुरूस्ती, देखभालीच्या कामासाठी मेन,हार्बरवर रविवारी मेगाब्लॉक

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 23 जून 2018:

रेल्वेमार्ग, ओव्हरडेह वायर आदींच्या देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेच्यावतीने मेन आणि हार्बर मार्गावर 24 जून रोजी रविवारी, मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. या मेगाब्लॉकमुळे दोन्ही मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे.

मुलुंड-माटुंगा अप स्लो मार्गावर सकाळी 11.10  ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत

  1. ठाण्याहून सकाळी 10.37 पासून दुपारी 4.02 वाजेपर्यंत अप धीम्‍या मार्गावर धावणाऱ्या  सर्व लोकल मुलुंड आणि माटुंगा स्‍थानका दरम्‍यान जलद मार्गावर वळविण्‍यात येतील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील.  माटुंगा स्‍थानका पासून सदर गाड्या अप स्लो मार्गावर वळविण्‍यात येतील.  
  2. सीएसएमटी येथून सकाळी 10.16 पासून दूपारी 2.54 वाजेपर्यत धावणाऱ्या डाऊन मार्गावरील जलद/अर्ध जलद गाड्या आपल्‍या नेहमीच्या थांब्‍यांव्‍यतिरिक्‍त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप मुलुंड आणि दिवा स्‍थानकावर थांबतील. या गाड्या 20 मिनटे उशि‍रा शेवटच्‍या स्‍थानकांवर पोहचतील. 
  3. कल्‍याण येथून सकाळी 11.04 पासून दूपारी 3.06 वाजेपर्यत प्रस्‍थान करणा-या अप मार्गावरील जलद/अर्ध जलद गाड्या आपल्‍या निर्धारित थांब्‍या व्‍यतिरिक्‍त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, आणि कुर्ला स्‍थानकावर थांबतील. या गाड्या 15 मिनटे उशि‍रा शेवटच्‍या स्‍थानकांवर पोहचतील.
  4. छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11.00 पासून सायंकाळी 06.00 वाजेपर्यत आगमन/प्रस्‍थान करणा-या डाऊन तसेच अप मार्गावरील धीम्‍या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनटे उशीरा पोहचतील. 
  5. अप जलद/अर्ध जलद गाड्या नाहुर, काजुंरमार्ग आणि विद्याविहार स्‍थानकासाठी उपलब्‍ध राहणार नाही.  या स्‍थानकांच्‍या प्रवाशांना वाया भांडुप, विक्रोळी आणि दिवा स्‍थानकावरून प्रवास करण्‍याची परवानगी देण्यात आली आहे.
  6. ब्‍लॉक काळात दादर/सीएसएमटी येथे आगमन होणा-या सर्व मेल/एक्‍सप्रेस गाड्या आपल्‍या गंतव्‍य स्‍थानंकावर 15 मिनटे उशीरा पोहचतील. 

कुर्ला-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते  सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत

  1. सीएसएमटीहून सकाळी 11.34 ते दूपारी 3.39 वाजेपर्यत वाशी/ बेलापुर /पनवेल येथे जाणा-या तसेच पनवेल/बेलापुर/वाशीहून सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 वाजेपर्यंत सीएसएमटी येथे जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील. 
  2. ब्‍लॉक काळात छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि वाशी/पनवेल खंडावर विशेष सेवा चालविण्‍यात येतील.
  3. ब्‍लॉक काळात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यत हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम रेल्‍वे/ मुख्‍य मार्गावर प्रवास करण्‍याची मुभा राहील. 

=============================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • स्पंदना- महिला लघउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ