सोमवारी मंत्रालय लोकशाही दिन

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 21 जून 2018:

नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 25 जून (सोमवारी) रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • राज्यातील सरकारी, निमसरकारी कार्यालयांमधील अडचणी आणि  तक्रारी संदर्भात मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत. अशा अर्जदारांनी   25 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील  व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कक्षात उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
  • मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील अर्जदारांना मंत्रालय लोकशाही दिनात मुख्यमंत्र्यांच्या समोर निवेदन करण्याकरिता मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे.

========================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • न्हावा शेवा- शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड