- नवी मुंबई महापालिकेच्या 17 माध्यमिक शाळांचा निकाल ८९ टक्के
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 11 जून 2018:
दहावी एस.एस.सी. बोर्ड परीक्षा – मार्च 2018 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 17 माध्यमिक शाळांचा निकाल 89 टक्के लागला असून महानगरपालिकेच्या शाळांतील प्रथम तीन क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षक, पालकांसह महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संगवे उपस्थित होते.
- वैष्णव गंगाराम कोंडाळकर ( 94.60 टक्के – नमुंमपा माध्यमिक शाळा, नेरूळ), रिश्वकुमार रविंद्र झा ( 92.60 टक्के – माध्यमिक शाळा, करावे ), पुनम पांडुरंग शिंदे ( 90.80 टक्के – माध्यमिक शाळा, सेक्टर 7, कोपरखैरणे ) हे गुणानुक्रमे महानगरपालिका शाळांतील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी तसेच त्यांचे मुख्याध्यापक अनुक्रमे अशोक सोनावणे, माधुरी नारखेडे, अजय कुपेकर यांनाही आयुक्तांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. त्याचप्रमाणे 100 टक्के निकाल लागलेल्या शाळांचे मुख्याध्यापक विजया ठाकूर ( दिवाळे ) आणि ज्ञानेश्वरी महाजन (दिघा) यांचेही कौतूक केले.
आगामी वर्षात सर्वच शाळांचा निकाल 100 टक्के लागावा याकरिता उत्साहाने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच येत्या शैक्षणिक वर्षात ए.व्ही.रूमची सुविधा उपलब्ध होत असल्याने त्याचा गुणवत्ता वाढीवर चांगला परिणाम होईल असा विश्वास व्यक्त आयुक्त रामास्वामी एन. यांनी केला