अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 8 जून 2018:
एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपामुळे एसटीचे सुमारे १५ कोटी रुपयाचं महसूल बुडाला आहे. दिवसभरात राज्यातील २५० आगारातून केवळ ३० % टक्केच एसटी बसेसच्या फेऱ्या सुटल्या. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
- एसटी प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील २५ आगार पूर्ण क्षमतेने चालू होते. तर १४५ आगारामध्ये अंशतः वाहतूक सुरु होती. राज्यातील ८० आगारातून दिवसभरात एकही एसटी बसची फेरी बाहेर पडली नाही.
संपामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल
- एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागाला बसला. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यात मोठया प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाली. या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भा मध्ये ६०% वाहतूक सुरु होती. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत होणाऱ्या ३५,२४९ बस फेऱ्यांपैकी १०,३९७ फेऱ्या सुरळीत सुरु होत्या, अशी माहिती एसटी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
इतर बातम्यांचाही मागोवा…
- स्पंदना- महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ