3 जूनच्या  मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 2 जून 2018:

रेल्वे मार्गाची दुरूस्ती तसेच तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने 3 जून रोजी, रविवारी मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकच्या काळात दोन्ही मार्गांवरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

माटुंगा-ठाणे डाउन स्लो लाईनवर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 पर्यंत

  • सकाळी 10.57 ते सायंकाळी 4.20 या काळात माटुंगा स्टेशनपासून सर्व डाउन स्लो गाड्या माटुंगा आणि ठाणे दरम्यान डाउन फास्ट मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्यांना सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबविण्यात येतील. त्यानंतर पुन्हा या गाड्या मुलुंड स्टेशनपासून स्लो डाउन मार्गावर वळविण्यात येतील.
  • मेगाब्लॉकच्या काळात विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या डाउन स्लो मार्गावर गाड्या थांबणार नाहीत. त्यामुळे या स्थानकांवरील प्रवाशांनी घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड स्थानकावरून प्रवास करू शकतात.
  • सकाळी 10.54 ते दुपारी 3.40  या काळात कल्याणवरून चालणाऱ्या सर्व अप फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 10.48 ते सायंकाळी 5 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या सर्व डाउन फास्ट गाड्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील. या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील .
  • सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसएमटीवरून येणाऱ्या तसेच सुटणाऱ्या सर्व स्लो गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.

 

सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40

  • सकाळी 11.34 वाजता वडाळाहून पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या सर्व डाउन हार्बर गाड्या तसेच सीएसएमटीहून सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४० या काळात पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या सर्व डाउन हार्बर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पनवेल,बेलापूर, वाशीहून सीएसएमटीला सुटणाऱ्या सर्व अप हार्बर मार्गावरील गाड्या सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत बंद राहतील.
  • सीएसएमटी वरून सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 या काळात वांद्रे, अंधेरी,गोरेगावसाठी सुटणाऱ्या सर्व डाउन हार्बर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गोरेगाव, अंधेरी, वांद्रे येथून सीएसएमटीदरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या सकाळी 10.5 ते दुपारी 4.58 या काळात रद्द राहतील.
  • मेगाब्लॉकच्या काळात पनवेल- कुर्लादरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
  • मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या काळात ट्रान्सहार्बर, मेन लाइन, पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

इतर बातम्यांचाही मागोवा

  • न्हावा शेवा- शिवडी ट्रान्सहार्बर लिंक

 

  • हॅंडलूम साड्यांना चालना देण्याचा प्रयत्न…