मुख्यमंत्र्यांचा इलेक्ट्रिक कारमधून फेरफटका

  • वाढत्या इंधन दरवाढीला टक्कर देण्यासाठी बॅटरीवरील कार

अविरत वाटचाल

मुंबई, 31 मे २०१८:

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराला टक्कर देण्यासाठी इलेक्ट्रिक व झूम कार अर्थात चार्जिंगवरील व बॅटरीवरील कार निर्माण करण्यात आलेल्या आहेत. या गाड्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या गाडीतून गेटवे ऑफ इंडिया परीसरात फेरफटकाही मारला.

ईईएसएल (एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिस लिमिटेड), टाटा मोटर्स व महिंद्रा ॲन्ड महिंद्रा यांच्या सहकार्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत.

सध्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांमध्ये  असंतोष पसरलेला आहे. यापार्श्वभूमीवर अनेक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात असलेल्या गाड्या बॅटरी व चार्जिंगवर चालणाऱ्या गाड्यांच्या पर्याय नक्कीच सुखावणारा आहे. 

  • गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री डॉ. हर्षवर्धन, युनायटेड नेशनमधील पर्यावरणचे कार्यकारी संचालक एरिक सोलहेम, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर,आमदार राज पुरोहित, महिंद्रा ॲन्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा, व्यवस्थापकीय संचालक डॉ.गोयंका, महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेशबाबू, झूम कारचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रेक मॉरन, परिवहन आयुक्त शेखर चन्ने आणि अभिनेत्री दिया मिर्झा आदींची उपस्थिती होती.


 

इतर बातम्या

  • तंबाखू खाणार त्याला …

 


  • हॅंडलूम साड्यांना चालना …