संग्रहीत फोटो
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 30 मे 2018:
राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 16 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या काळात पुणे जिल्हयातील उरळी देवाची येथे हा मेळावा होणार आहे. 10 उत्तीर्ण ते पदवीधर मुला-मुलींना या मेळाव्यातून रोजगाराची संधी मिळणार आहे.
- या मेळाव्यात पुणे परिसर व जिल्ह्यातील प्रमुख उद्योग, कारखाने तसेच माहिती तंत्रज्ञान, औषध उत्पादक, हॉटेल उद्योग आदी क्षेत्रातील 80 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
- संबंधित कंपन्या आपल्या प्रतिनिधीमार्फत इच्छुक उमेदवारांची आवड निवड लक्षात घेऊन प्रत्यक्षात नोकरीची संधी उपलब्ध करुन देणार आहेत.
- या मेळाव्यात कौशल्य विकास व स्वयंरोजगार या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
- मेळाव्यात शासनाच्या विविध विभागांची रोजगार-स्वयंरोजगार संबंधीची दालने मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील.
- या ठिकाणी इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच मेळाव्यानंतरही त्यासंबंधीचा पाठपुरावा केला जाणार आहे.
- सीआयआय या उद्योग संघटनेचा या उपक्रमात प्रमुख सहभाग आहे. राज्याच्या विविध भागात अशा प्रकारे मेळावे आयोजित केले जाणार असून त्याद्वारे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी www.balasahebthackrayrojgarmeleva.com या संकेतस्थळावर 4 ते 10 जून दरम्यान नोंदणी करावी, असे आवाहन उद्योग मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या ः
- न्हावा शेवा-शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड