दुपारी 1 पासून निकाल पाहता येणार
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 29 मे 2018:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या ( 30 मे) रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागिय मंडळांमध्ये बारावीची परिक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातून 14 लाख 85 हजार विद्यार्थी या परिक्षेला बसले होते.
या साईटवर निकाल पाहता येणार आहे.-
hscresult.mkcl.org
31 मे ते 9 जून या कालावधीत गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे.